MBA Admissions 2020-21

MBA Admissions 2020-21

पुम्बात बीबीए, प्रवेश प्रक्रिया सुरू

PUBLISH DATE 4th June 2018

खासगी क्षेत्रात उत्तम व्यवस्थापन आणि सुविधांची गरज भागविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागात (पुम्बा) आता 'बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अॅन्ड फॅसिलिटीज मॅनेजमेंट' (बीबीए इन एचएफएम) हा तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश हे सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे (सीईटी) होणार आहेत. या नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाच्या विभागांमध्ये पदव्युत्तर आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासोबात आता केवळ पदवी अभ्यासक्रम सुरू होण्याला सुरुवात झाली आहे.

'चांगल्या प्लेसमेंटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 'पुम्बा'मध्ये हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता ४० अशी ठेवण्यात आली आहे,' अशी माहिती पुम्बाचे संचालक डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे. सुरुवातीला केवळ हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज या शाखेत सुरू होणारा हा अभ्यासक्रम भविष्यात विविध शाखांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी विविध शाखा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, विद्यापीठांच्या विविध विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रम चालविण्यात येतात. विद्यापीठाच्या विभागात क्वचित पदवी अभ्यासक्रम सुरू होतात. त्यामध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. बारावीची परीक्षा कला, वाणिज्य, व्होकेशनल आणि विज्ञान विद्याशाखेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. 'पुम्बा'मध्ये सध्या एमबीए आणि एक्झिक्युटीव्ह एमबीए असे प्रमुख अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेत रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. तसेच, विभागात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्लेसमेंट सेलदेखील कार्यरत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी सेलचे सहकार्य मिळणार आहे. राज्यात पहिल्यांदाच विद्यापीठाच्या विभागाचा अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.

.....

अभ्यासक्रम कोणासाठी उपयोगी

'पुम्बा'मध्ये येत्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये सुरू होणारा हा अभ्यासक्रम मास्टर्स इन बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास उत्सुक असणाऱ्याला फायद्याचा ठरेल. त्याचप्रमाणे बीबीए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आयटी कंपन्या, मॉल्स, पंचतारांकीत हॉटेल्स, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट ऑफिस, मोठे हॉस्पिटल, मध्यम व मोठ्या स्वरूपाच्या उद्योगांमध्ये व्यवस्थापन आणि सुविधा पुरविण्याबाबतच्या नोकऱ्या मिळू शकतात. यासोबतच देशात आणि परदेशात होणाऱ्या कार्यक्रम, स्पर्धा, कॉन्सर्ट, परिषदा, चर्चासत्रे यांचे नियोजन करण्याची संधी अभ्यासक्रमातून उपलब्ध होणार आहे.

.........

'पुम्बा'त संपर्क करण्याचे आवाहन

'ऑनलाइन अर्ज विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या www.pumba.in वेबसाइटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची आणि विभागात जमा करण्याची शेवटची मुदत २० जून आहे. विद्यार्थ्यांसाठी अर्ज करताना शुल्कही ऑनलाइनद्वारे भरण्याची सुविधा आहे. खुल्या गटांसाठी ५०० रुपये, तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षेच्या गुणांवरुन प्रवेश दिला जाणार असून २४ जून रोजी १०० गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. अधिक माहिती वेबसाइटवर मिळेल. तर, मार्गदर्शनासाठी 'पुम्बा'मध्ये संपर्क करावा,' असे डॉ. पवार यांनी सांगितले.

.........

बीबीए इन एचएफएम प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक

...................

- ऑनलाइन अर्जासाठी मुदत : २० जूनपर्यंत

- प्रवेश परीक्षा : २४ जून

- प्राथमिक गुणवत्ता यादी : २७ जून

- अंतिम गुणवत्ता यादी : २ जुलै

- प्रत्यक्ष प्रवेश : २ जुलै ते १० जुलै

Click here Details of All  : Entrance Exams 2018

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)