Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

अभियोग्यता चाचणीच्या ठिकाणी मोबाईलला बंदी

PUBLISH DATE 9th December 2017

खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होणारी अभियोग्यता चाचणी चार दिवसांवर आली आहे. या परीक्षेच्या नियोजनासाठी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तयारी सुरू केली आहे. परीक्षार्थींना चाचणीसाठी नियोजित वेळेच्या दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोचायचे आहे. या केंद्राच्या ठिकाणी पुस्तके आणि मोबाईल यांसह अन्य साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

अभियोग्यता चाचणी 12 डिसेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेला जाताना प्रवेशपत्र आणि त्याबरोबर छायाचित्र असलेले अधिकृत ओळखपत्र ठेवणे आवश्‍यक आहे. परीक्षार्थींनी प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यावर उमेदवाराचे छायाचित्र असेल; परंतु या प्रवेशपत्रावर दुसरे छायाचित्र लावावे लागणार आहे. उमेदवार परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्याला संगणक आणि त्याबरोबर ऑनलाइन परीक्षेसाठी पासवर्ड दिले जाणार आहेत. त्यासाठी परीक्षेच्या आधी दीड तास बोलावण्यात आले आहे, असे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले. 

पुण्यातील परीक्षा केंद्रे 
- अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, राजीव गांधी आयटी पार्कजवळ, हिंजवडी 
- रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, वाघोली 
- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बुद्रुक, हडपसर 
- हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, आझम कॅंपस, पुणे