Tech-Savvy

Tech-Savvy

मातृभाषेतील ज्ञानासाठी ‘मराठी विकीपीडिया’

PUBLISH DATE 2nd November 2017

जगभरातील लोक विचारांची आणि ज्ञानाची देवाण- घेवाण करण्यासाठी सर्वपरिचित अशा जागतिक भाषांचा वापर करत आहेत. अशा वातावरणात जागतिक पातळीवर आपल्या भाषेचे अस्तित्व जपण्यासाठी आणि मातृभाषेतून ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी, ‘मराठी विकीपीडिया’ महत्त्वाचे आहे, असे मत ‘विकीपीडिया’वर मराठीचे स्थान वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे अभय नातू यांनी व्यक्त केले.

व्यवसायानिमित्त १९९६ मध्ये अमेरिकेत गेलेले नातू हे मराठीशी असलेले नाते ‘मराठी विकीपीडिया’च्या साह्याने अधिक दृढ करत आहेत. मराठी भाषेतून ज्ञान उपलब्ध होण्यासाठी ते २००५ पासून या प्रकल्पात सक्रिय आहेत. मराठी भाषा अधिकाधिक लोकांनी बोलली आणि टिकवली पाहिजे.

मातृभाषेत अधिकाधिक ज्ञान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आपण या उपक्रमात सहभागी झाल्याचे नातू यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘जगभरातील जवळपास सात ते आठ कोटी नागरिक मराठी बोलतात, त्यामुळे विकीपीडियावर मराठीतून शोध घेण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. महिन्याभरात जवळपास एक लाखाहून अधिक नागरिक मराठीतून माहिती शोधत आहेत. यात प्रामुख्याने सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी ‘सर्च’ करण्यात येते. म्हणूनच सरकारी निर्णय, योजना या संदर्भातील माहिती विकीपीडियाद्वारे उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारी पातळीवर संवाद साधण्यात येत आहे.’’

मराठी भाषेत संकलित असलेल्या विविध विषयांवरील माहिती विकीपीडियावर अपडेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे. भाषेप्रती असणाऱ्या सेवाभावी वृत्तीतून जवळपास शंभरहून अधिकजण विकीपीडियावर सातत्याने माहिती अपडेट करत आहेत, असेही नातू यांनी सांगितले.

विकीपीडियावर ‘मराठी’ मागे आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर देताना नातू म्हणाले, ‘‘मराठी भाषेची तुलना इंग्रजी, जर्मन अशा भाषांशी करणे योग्य वाटत नाही. विकसित देशांमध्ये इंटरनेटचे जाळे अधिक प्रमाणात आहे. मात्र, देशातील मल्याळी, बंगाली अशा काही प्रादेशिक भाषांमध्ये मराठीपेक्षा अधिक काम झाले असले, तरीही ‘मराठी’ भाषेतील काम निश्‍चितच स्वागतार्ह आहे. मराठी विकीपीडियावर २००५मध्ये आपण एक हजार लेखांचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर गेल्या दहा- बारा वर्षांत आपण ४८ हजार लेखांचा टप्पा ओलांडला आहे. मराठी भाषेतील ज्ञान वेगाने विकीपीडियावर येत आहे.’’

जागतिक पातळीवर देवाण- घेवाण करताना भाषा एकमेकांत मिसळत आहेत. व्यवहाराची भाषा अधिक करून वापरली जात आहे. परिणामी आगामी काही दशकांत बऱ्याचशा भाषा लुप्त होण्याची भीती आहे.
- अभय नातू

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------