Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

शिक्षक भरती जुलैपर्यंत पूर्ण होणार

PUBLISH DATE 3rd June 2019

शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेतील उमेदवारांची मुलाखतीशिवाय होणारी भरती ही जूनमध्ये, तर मुलाखतीद्वारे राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेतील अडचणी दूर करून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे नियोजन उमेदवारांना काहीसा दिलासा देणारे म्हणावे लागेल. 

पुणे - शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेतील उमेदवारांची मुलाखतीशिवाय होणारी भरती ही जूनमध्ये, तर मुलाखतीद्वारे राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेतील अडचणी दूर करून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे नियोजन उमेदवारांना काहीसा दिलासा देणारे म्हणावे लागेल. 

भरती प्रक्रियेतील उमेदवारांना माहिती अपलोड करताना आणि शाळांचे प्राधान्यक्रम देताना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोर्टल दोन दिवसांसाठी तात्पुरते बंद ठेवले. तांत्रिक दुरुस्तीबरोबरच सरकारी निर्णयामुळे भरती प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलांप्रमाणे पोर्टल अपग्रेड करण्यात येणार आहे. त्यासाठी आठवडा लागेल. त्यानंतर पुढील आठवड्यात पोर्टल कार्यान्वित होणार आहे. उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा दिली जाईल. त्यासाठी ठरावीक कालावधीही मिळेल, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

उमेदवारांनी शाळांचे पसंतीक्रम दिल्यानंतर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह 13 ते 14 शिक्षण संस्थांमधील सुमारे नऊ हजार जागांसाठी मुलाखतीशिवाय भरती होणार आहे. यामध्ये मुलाखतीशिवाय निवड होणाऱ्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर होऊन त्यांना निवडपत्र दिले जाईल. ही प्रक्रिया जूनच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याच दरम्यान मुलाखतीद्वारे होणारी भरती सुरू राहणार आहे. मुलाखतीशिवाय असणाऱ्या भरतीमध्ये निवड न झालेल्या आणि मुलाखतीद्वारे भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी लावण्यात येईल. यामध्ये एका उमेदवाराला दहा वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीसाठी जाता येणार आहे. त्यासाठी महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्या एका महिन्यात संबंधित संस्थेतर्फे निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना निवडपत्र देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जवळपास तीन हजार जागांसाठी असेल. या प्रक्रियेला अधिक काळ लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, ती जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही सोळंकी यांनी नमूद केले. 

गेल्या वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागतो. या प्रक्रियेचा आतापर्यंतचा वेग पाहता, ही प्रक्रिया आणखी काही महिने लांबण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन 

 

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------