TET and MahaTAIT

TET and MahaTAIT

महाराष्ट्र शिक्षक भरतीचे नवे नियम

PUBLISH DATE 29th June 2018

राज्य सरकारने नव्या निर्णयानुसार २००८ च्या शासन निर्णयाप्रमाणे इंग्रजी माध्यमातून डीएड करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक भरतीत २० टक्के राखीव जागांचे आरक्षण काढून टाकले आहे. 'पवित्र पोर्टल'च्या माध्यमातून शिक्षक भरती होणार असल्याने आणि इंग्रजी माध्यमासाठी शिक्षक उपलब्ध होत असल्याने सरकारने हा निर्णय बुधवारी घेतला आहे.

प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीसाठी गणित व विज्ञान हे दोन्ही विषय नसल्याने इंग्रजी विषयातील शिक्षकांची गरज भासणार नाही. भविष्यात केवळ सहावी ते आठवीसाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची गरज आहे; तसेच राज्यातील अनेक शिक्षक इंग्रजी शिकविण्यासाठी तयार आहेत. त्यामुळेच २००८ सालच्या शासन निर्णयाप्रमाणे दिलेले हे आरक्षण रद्द करण्यात आल्याचे निर्णयात नमूद केले आहे. ज्या शाळांना शासन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकारे कोणतेही अनुदान देत नाही, अशा शाळांना 'पवित्र' प्रणालीतून शिक्षक भरती करण्याची आवश्यकता राहणार नाही.

यात सर्व विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे; तसेच सर्व अल्पसंख्याक समाजाच्या शाळांना विशेष अधिकार असल्याने त्यांनाही 'पवित्र पोर्टल'मधून भरती आवश्यक नाही. त्याचबरोबर राज्यात काही विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. मात्र, यातील ज्या शाळांना भविष्यात अनुदान मिळण्याची शक्यता आहे, अशा सर्व शाळांना पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी आवश्यक आहे. भविष्यात कधीच अनुदान मिळणार नाही, अशा स्वयंपूर्ण मराठी, इंग्रजी शाळांना भरतीचा आदेश लागू नाही. राज्यात फार पूर्वी परवानगी दिलेल्या काही अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळाही आहेत, त्यांना मात्र हे पवित्र प्रणालीचे नियम लागू राहणार आहेत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------