Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

महा ‘टीईटी’ ८ जुलै रोजी

PUBLISH DATE 22nd April 2018

“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” मधील तरतूदीनुसार इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात येत आहे. 

ही बाब प्राथमिक शिक्षण (इ. १ ली ते ८ वी) देणा-या सर्व शाळांमध्ये (सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व परीक्षा मंडळे, अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित इ.) सर्व शिक्षकांना लागू राहील.

“शिक्षक पात्रका परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये कनिष्ठ प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व वरिष्ठ प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही गटासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका आवश्यक राहील. 

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. 

राज्यात शालेय शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या जुलै महिन्यात एकूण आठ भाषांमध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा ८ जुलै महिन्यात घेण्यासाठी नियोजन केले असून, मान्यतेसाठीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेच्या सूत्रांनी दिली आहे.

शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवी सर्व व्यवस्थापन, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा

अधिक माहिती जाहिरात | परीक्षा शुल्क  | प्रश्नपत्रिका | आराखडा | पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) |  वेळापत्रक  शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)

शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची अट घातली आहे. त्यानंतर डीएड शिक्षकांना अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राज्यात २०१३ रोजी पहिल्यांदा टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०१४ व २०१६ रोजी ही परीक्षा झाली. त्यानंतर गेल्या वर्षी २२ जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार ही परीक्षा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साधारण ८ जुलै रोजी घेण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यासंदर्भातील बैठका देखील घेण्यात आल्या. या नियोजनाला मान्यता मिळण्यासाठी ते शिक्षण विभागाला पाठविण्यात आले आहे, असे परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

अधिक माहिती जाहिरात | परीक्षा शुल्क  | प्रश्नपत्रिका | आराखडा | पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) |  वेळापत्रक  शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)

अभ्यासक्रमात बदल नाही

टीईटी परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत ही परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या भाषांमध्ये घेण्यात येत होती. मात्र, यंदापासून ही परीक्षा गुजराती, तेलगू, कन्नड, सिंध अशा चार प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परीषदेतील सूत्रांनी दिली आहे. राज्यातील भावी शिक्षकांनी मागणी केल्याने भाषा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ही परीक्षा एकूण आठ भाषांमध्ये होणार आहे. तर, परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा देखील आठ भाषेत घेण्यात येते.

विद्यार्थी मित्र लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सराव परीक्षा घेणार आहे.

नाव नोंदणी करिता TET    MOCK EXAM REGISTRATION

 

 

 

अधिक माहिती जाहिरात | परीक्षा शुल्क  | प्रश्नपत्रिका | आराखडा | पाठ्यक्रम (अभ्यासक्रम) |  वेळापत्रक  शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)

TET    MOCK EXAM REGISTRATION

Read More | NEET UG

Click here Details of All  : Entrance Exams 2018