Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

महा टी ई टी 2018 ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची शेवटचा दिवस

PUBLISH DATE 22nd May 2018

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१८ - ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची मुदत - २२/०५/२०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला असून सदर परीक्षा दि. ०८/०७/२०१८ ऐवजी १५/०७/२०१८ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.

सूचना :
 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना

खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

१. ऑनलाईन नोंदणी.

२. पोर्टल लॉगिन.

३. आवेदनपत्र भरणे.

४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.

५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.

६. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.

१. ऑनलाईन नोंदणी

अर्ज भरण्याविषयीच्या सूचना www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०१८ उपक्रम' मधील 'नवीन नोंदणी करा' या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या

" मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा -२०१८ साठी अर्ज भरू इच्छितो" या पर्यायासमोरील चेकबॉक्स सिलेक्ट करा, नोंदणी फॉर्म भरण्यासाठी "नवीन नोंदणी" या बटनावर क्लिक करा.

नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.

अर्जदाराचे प्रथम नाव / आडनाव / जन्म दिनांक / लिंग / मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी

वरील माहिती अचूक भरून झाल्यावर "Submit" या बटनावर क्लिक करा. नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वरच सदर परीक्षार्थीचा TET रेजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड पाठविला जाईल.

नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी या परीक्षेसाठी पुनर्नोंदणीसाठी वापरता येणार नाही.

२. पोर्टल लॉगिन

www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०१८ उपक्रम' मधील 'लॉगिन' या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात आपला TET रेजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून "Submit" या बटनावर क्लीक करा. पासवर्ड विसरला असल्यास "फॉरगॉट पासवर्ड" या पर्यायाचा वापर करा.

३. आवेदनपत्र भरणे

प्राप्त झालेल्या TET रेजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड द्वारे Login करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा, लॉगिन केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.

i) अर्जदाराविषयी माहिती -

 • अर्जदाराचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे / पतीचे नाव व आईचे नाव भरा. जर नावात कोणता बदल असेल तर बदललेल्या नावाची माहिती द्या.
 • अर्जदार पुरुष, स्त्री अथवा ट्रान्सजेन्डर आहे ते अचूकपणे निवडा.
 • एस.एस.सी. प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, एस.एस.सी. प्रमाणपत्र क्रमांक, उत्तीर्णतेचे वर्ष, महिना व बैठक क्रमांक अचूकपणे भरा.
 • आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून उघडलेल्या चौकटीत संबंधीत क्रमांक अचूक नमूद करा.
 • राष्ट्रीयत्व निवडा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' वर क्लिक करा.

ii) अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती -

 • यामध्ये सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, क्षेत्र नमूद करावे. शहराचे / गावाचे नाव, पोस्ट (असल्यास) ठिकाण टाईप करावे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडावे. अर्जदार महाराष्ट्राबाहेरील असल्यास Dropdown लिस्ट मधील पर्यायांपैकी इतर राज्य निवडा तसेच तालुका, जिल्हा आणि पिनकोड नमूद करा.

iii) अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती -

 • जातीचा प्रवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
 • दिव्यांग असल्यास ‘ होय ’ अथवा नसल्यास ‘ नाही ’ पर्याय निवडा. होय पर्यायावर क्लिक केल्यास दिव्यंगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनिक हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंदवा (दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविण्याबाबत तसेच अनुग्रह कालावधीबाबत अनुज्ञेयता मार्गदर्शक सूचना www.mahatet.inया संकेतस्थळावर तपासून पहाव्यात.)

iv) अर्जाचा स्तर (पेपर I / पेपर II) -

 • ज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास ‘ For Both / दोन्ही साठी ‘ हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.)

v) परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती -

 • अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा मानून ग्राह्य धरले जाईल.
 • द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा (उर्दू/ बंगाली / गुजराती / तेलगू / सिंधी / कन्नड / हिंदी) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.
 • उर्दू माध्यम निवडले असल्यास, दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) उर्दू आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.
 • जर मराठी / इंग्रजी किंवा इतर माध्यम (जसे की कन्नड, तेलगु, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली) निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) मराठी आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.
 • अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे, तो जिल्हा Dropdown लिस्ट मधील अचूकपणे निवडा.

vi) शैक्षणिक पात्रता -

 • शैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी. पात्रतेविषयी माहिती भरावी तसेच एच.एस.सी.ची, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी/श्रेणी व शततमक / श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी.
 • पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी. आणि पदवीची पात्रतेविषयी माहिती भरावी, तसेच एच.एस.सी., पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी/श्रेणी व शततमक / श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी.

vii) व्यावसायिक पात्रता -

 • व्यावसायिक पात्रता मध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदविकेचे नाव, विद्यापीठ/परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, शततमक / श्रेणीअचूकपणे नोंदवा.
 • पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदविकेचे नाव, विद्यापीठ/परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, शततमक / श्रेणीअचूकपणे नोंदवा.
 • अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हींची माहिती अचूकपणे नोंदवा. पदव्युत्तर शिक्षणशास्त्र पदवी (असल्यास) त्याविषयीची माहिती नोंदवा.

viii) छायाचित्र ओळख -

 • आयडेन्टीटी प्रुफ ( ओळखीचा पुरावा) म्हणून पहिल्या चौकटीतील Dropdown लिस्ट मधून आपल्याकडे पुरावा असलेल्या कोणत्याही एका पर्यायाची निवड करा. दुसऱ्या चौकटीत त्याचा क्रमांक नमूद करा.

 • फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती-
  • अ) ३.५ से.मी. X ४.५ से.मी. १०० KB चा रंगीत फोटो स्कॅन करावा. स्कॅन इमेज फोटो बॉर्डर पर्यंत क्रॉप करण्यात यावा. सदर इमेज ५ KB ते १०० KB या आकारामध्येच बसेल याची खात्री करून घ्यावी.
  • ब) ३.५ से.मी. X ४.५ से.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर आखावा त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ ५० KB मध्ये स्कॅन करावे व क्रॉप करावा. स्वाक्षरीची इमेज २ KB ते ५० KB या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.

 • प्रतिज्ञापत्र वाचून ते मान्य असल्यास चौकटीत क्लिक करा आणि ऍप्लिकेशन फॉर्म Save / Preview करा.

४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे

भरलेल्या अर्जातील माहिती पाहण्यासाठी Preview या टॅब वर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.

माहितीत बदल करावयाचा असल्यास स्क्रिनच्या शेवटी असलेल्या "Edit " बटनावर क्लिक करून आवश्यक ते बदल करा आणि पुन्हा Preview या बटनावर वर क्लिक करून स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून "Submit " या बटनावर क्लिक करा.

अर्जदाराने ऑनलाईन परीक्षा शुल्क यशस्वीरीत्या भरल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तसेच त्यानंतर अर्जामधील माहिती बदलाबाबत कोणतेही निवेदन/अर्ज यांचा विचार केला जाणार नाही.

५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे

सर्व माहिती अचूक भरून झाल्यावर "Payment" या Tab वर क्लिक करा, स्क्रीनवर आलेली परीक्षा शुल्क संदर्भातील माहिती अचूक असल्याची खात्री करा.

Make Payment या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व एटीएम पीन, इंटरनेट बँकिंग, Wallet / कॅश कार्ड व UPI असे पर्याय उपलब्ध होतील. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे.

चलनाद्वारे / ऑफलाइन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही.

ऑनलाईन परीक्षा शुल्क भरतेवेळी इंटरनेट कनेक्शन नसणे, वीज पुरवठा खंडित होणे यामुळे परीक्षा शुल्क जमा न झाल्यास पुन्हा Login करून परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे.

परीक्षा शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर Payment Successful असा मेसेज येईल आणि ‘ Transaction Details’ / Transaction Receipt स्क्रीनवर दिसेल.

Payment History या टॅब वर क्लिक करून अर्जदारास सदर Transaction Receipt पाहता व प्रिंट घेता येतील.

६. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.

परीक्षा शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता " Preview / Print " या टॅब चा वापर करावा.

आवेदनपत्राची प्रिंट गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांचेकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.

 

संदर्भ :- 

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम 

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम 

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके 

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

अधिक माहिती | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T) २०१८

विद्यार्थी मित्र लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सराव परीक्षा  

नाव नोंदणी करिता TET    MOCK EXAM REGISTRATION

VidyarthiMitra.org | Law CET Mock Exam

विद्यार्थी मित्र लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सराव परीक्षा  

नाव नोंदणी करिता TET    MOCK EXAM REGISTRATION

पात्रता परीक्षा (टीईटी)

TET    MOCK EXAM REGISTRATION

Read More | NEET UG

Click here Details of All  : Entrance Exams 2018

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------