Schools

Schools

नवोदय विद्यालय परीक्षाआता नव्या स्वरूपात

PUBLISH DATE 26th October 2018

ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना नवोदय विद्यालयात शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळण्यासाठी होणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा (जेएनव्ही) आता नव्या स्वरूपात होणार असून, परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी प्रथमच ओएमआर शीटचा वापर करण्यात येणार आहे. तर, परीक्षेची स्पर्धा परीक्षेप्रमाणे काठिण्यपातळी वाढविण्यासोबतच प्रश्नांच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे.

नवोदय विद्यालय समितीने ६ एप्रिल २०१९ रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचे निकष नुकतेच जाहीर केले आहे. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार या परीक्षेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. इयत्ता पाचवीत असणारे विद्यार्थी ही परीक्षा देतात. यापूर्वी होणाऱ्या नवोदय परीक्षेमध्ये ओएमआर शीटचा वापर करण्यात येत नव्हता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, उत्तरपत्रिका तपासताना चुकादेखील होत होत्या. यासोबतच उत्तपत्रिकांची तपासणी करण्यात खूप वेळ जायचा आणि त्यामुळे निकाल उशीर लागत होता. मात्र, ओएमआर शीटमुळे उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकीय पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे ती अचूक राहणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांनी सोडविलेली उत्तरे व्यवस्थित समजणार आहेत.

यापूर्वी मानसिक क्षमता चाचणी ५० प्रश्नांची (५० गुण) तर गणित आणि भाषा विषयाची चाचणी प्रत्येकी २५ प्रश्न (५०) गुणांसाठी विचारण्यात येत होती. मात्र, यापुढे मानसिक क्षमता चाचणी ४० प्रश्नांची राहणार असून त्याला ५० गुण राहणार आहे. यासोबतच गणित आणि भाषा विषयाच्या पेपरमध्ये प्रत्येकी २० प्रश्न ५० गुणांसाठी विचारण्यात येणार आहे. हे प्रश्न चित्र, आकृत्या, उतारे, रिकाम्या जागा भरा अशा स्वरूपात विचारण्यात येईल. त्यामुळे परीक्षेची काठिण्यपातळी वाढली असून, परीक्षा ही स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर घेण्यात येईल. दरम्यान, परीक्षेचा कालावधी दोन तासांचा ठेवण्यात आला असून, सूचना वाचण्य़ासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षण नवोदय विद्यालयमधून इयत्ता बारावीपर्यंत होते. राज्यात एकूण ३४ नवोदय विद्यालये असून प्रत्येक विद्यालयाची प्रवेशक्षमता ८० विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यत परीक्षेसाठी नोंदणी करता येईल. अधिक माहिती www.navodaya.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Inputs | MATA Online

Read More| Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test

Recommended Books

Books play a very important role for the preparation of any kind of examination. The following table shows the names of the books which every aspirant must study:

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

CAT

Exam date:25 Nov 2018

Last date of Application: 19 Sept 2018

https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2019

https://goo.gl/gBdyF8

CTET

Teacher Education