RTE Admissions

RTE Admissions

आरटीई प्रवेशासाठी आता स्वतंत्र ‘ॲप’

PUBLISH DATE 16th February 2019

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षणांतर्गत आता मोबाईलद्वारेही प्रवेश घेता येणार आहे. राज्य सरकारमार्फत ‘आरटीई २५ टक्के’ हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर विकसित करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर सुरू असून, आता ते लवकरच पालकांनाही वापरण्यासाठी उपलब्ध होणार आहे. 

आरटीई २५ टक्के आरक्षणांतर्गत राखीव जागांवर प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ऑनलाइन अर्ज भरताना राहत्या घरापासून शाळा निवडताना पालकांचा गोंधळ उडतो. परंतु, पालकांनी आता मोबाईलवरून ॲपद्वारे अर्ज भरल्यास किलोमीटरनुसार शाळा निवडणे सोईस्कर होणार आहे. प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ‘आरटीई २५ टक्के’ हे ॲप नव्याने कार्यान्वित होणार आहे. त्याशिवाय  विविध कागदपत्रांची पूर्तता करणे पालकांना जिकिरीचे जाते. त्यामुळे प्रवेशासाठी पालकांकडे सहज उपलब्ध असणारी  कागदपत्रे अधिकृत माहितीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी सांगितले. 

या वर्षीपासून रहिवासी दाखला म्हणून गॅस जोडणी कार्ड, रेशन कार्ड, बॅंक पासबुक, घरपट्टी भरल्याची पावती हे देखील पालकांना दाखविता येणार आहे. तहसीलदारांकडून आणलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जातोच. याबरोबरच पालक जर नोकरदार असतील, तर पगाराचे स्टेटमेंट देखील उत्पन्नाचा पुरावा म्हणून प्रवेशासाठी दाखविता येणार आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ‘ॲप’ सुरू करणे बाब चांगली असली, तरीही ते केवळ पुणे-मुंबई पुरतेच वापरले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियेत रहिवासी दाखला म्हणून बॅंक पासबुक, रेशन कार्ड, गॅसजोडणी कार्ड हे देखील ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे रहिवासी दाखला दाखविण्यासाठी येणाऱ्या अडचणी काही प्रमाणात सुटण्याची आशा आहे.
- शरद जावडेकर, संघटक, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा

राज्य सरकारने मराठा समाजाला राखीव जागा जाहीर केल्या. यामुळे या समाजाला आरटीई २५ टक्के प्रवेशांतर्गतही आरक्षण मिळणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षण आहे. यातील वंचित घटकामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्‍यक असेल.
- दिनकर टेमकर, शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) 

Click to View| Upcoming Entrance Exams

India's Leading Educational Web Portal now available on Google play store                 https://goo.gl/HbsLr2
 

Check FYJC & ALL COURSES UNDER DTE & DMER - Previous & Current Year Cutoff |  http://vidyarthimitra.org/rank_predictor

OR

Download App Now : Cut-offs 2019

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------