Tech-Savvy

Tech-Savvy

पुढील सहा महिने घरूनच काम: पुण्यातील आयटी कंपन्यांचे धोरण

PUBLISH DATE 2nd July 2020

शहर आणि परिसरातील आयटी कंपन्यांतील सुमारे ७० टक्के कर्मचारी सध्या घरातून काम करीत आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारनेही आयटी कंपन्यांना ३३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगी दिली आहे. 

कोरोनामुळे आयटीतील बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे अजूनही वर्क फ्रॉम होमच सुरू आहे. यामुळे कामावर आणि उत्पादकतेवर फारसा परिणाम होत नसल्याचे निरीक्षणही कंपन्यांनी नोंदविले. पुढील किमान तीन ते सहा महिने असेच काम होणार असल्याने काही कंपन्यांनी त्यांच्या भाडेतत्त्वावरील जागा परत करून खर्च कमी केला आहे.

शहर आणि परिसरातील आयटी कंपन्यांतील सुमारे ७० टक्के कर्मचारी सध्या घरातून काम करीत आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारनेही आयटी कंपन्यांना ३३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगी दिली आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील तीन ते सहा महिने वर्क फ्रॉम होम करण्याची तयारी ठेवण्यास सांगितले आहे. याबाबत एका बहुराष्ट्रीय कंपनीतील आयटी अधिकारी दिनेश सुभेदार म्हणाले, ‘‘अजून किमान दोन महिने याच पद्धतीने कामकाज होणार आहे.’’ तर मोबी ॲण्ड डिजिटल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित गोखले म्हणाले, ‘‘वर्क फ्रॉम होममुळे उत्पादकतेत फरक पडलेला नाही.’’

कोरोनामुळे आम्हाला सध्या घरातूनच काम करावे लागत आहे. पुढील दोन-तीन महिने अशी परिस्थिती असू शकते. आता वर्क फ्रॉम होमला आम्ही सरावलो असून कामही चांगल्या पद्धतीने सुरू आहे.- केदार देव, सॉफ्टवेअर डेव्हलपर

वर्क फ्रॉम होममध्ये

  1. कंपन्यांकडून इंटरनेट पुरविले जाते 
  2. कामाची पद्धत, वेळ, प्रोजेक्‍ट यावर देखरेख 
  3. साप्ताहिक सुटी व रजाही देण्यात येते 
  4. किमान ८ ते १० तास काम 
  5. ग्रुप, कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉलचे प्रमाण वाढले

तंत्रज्ञानाची चाचपणी
सध्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ऑनसाइट जाणे बंद झाले आहे. त्यामुळे संबंधित साइटवर काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची मदतही घेतली जात असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आले.

येथे आहेत प्रमुख आयटी कंपन्या 
हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, नगर रस्ता, बाणेर

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा