DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

हॉटेल मॅनेजमेंटच्या अर्जांसाठी २३ जूनपर्यंत मुदत

PUBLISH DATE 19th June 2018

शैक्षणिक वर्षातही हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन सामाईक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाच्या वेबसाइटवर याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रियेचे विविध टप्पे पार पडून १ ऑगस्ट रोजी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. १४ ऑगस्टपर्यंत सर्व प्रवेश पूर्ण होणार असल्याचेही तंत्रशिक्षण संचलनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. हॉटेल मॅनजमेंट अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळेल त्यांनी १ जुलै ते २२ जुलै या कालावधीत शुल्क भरून प्रवेश घ्यावा. दुसऱ्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ९ ते २२ जुलै दरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी आणि तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांनी १७ ते २२ जुलै दरम्यान प्रवेश घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचलनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा :

- ऑनलाइन अर्ज करणे : १५ जून ते २३ जून २०१८ पर्यंत

- अर्ज निश्चिती : १६ जून ते २३ जून (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

- प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करणे : २४ जून

- गुणवत्ता यादीबाबत आक्षेपांची नोंद : २५ व २६ जून

- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी : २७ जून

- संवर्गनिहाय उपलब्ध जागांचा तपशील : २७ जून

- पहिल्या फेरीसाठी ऑनलाईन पसंतीक्रम : २८ आणि २९ जून

- पहिल्या फेरीची प्रवेश यादी : ३० जून

- पहिल्या फेरीनुसार प्रवेश प्रक्रिया १ ते ३ जुलै

- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील : ४ जुलै

- दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन पसंतीक्रम : ५ ते ७ जुलै

- दुसऱ्या फेरीसाठी प्रवेशयादी जाहीर : ८ जुलै

- दुसऱ्या फेरीनुसार प्रवेश ९ ते ११ जुलै

- तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्धी : १२ जुलै

- तिसऱ्या फेरीसाठी ऑनलाइन अर्ज : १३ ते १५ जुलै

- तिसऱ्या फेरीसाठी प्रवेश यादी : १६ जुलै

- तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश सुरू : १७ ते २० जुलै

इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

त्याचबरोबर ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------