Board Exams

Board Exams

आजपासून बारावीची परीक्षा

PUBLISH DATE 21st February 2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला राज्यातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. 

यंदा प्रथमच प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले होते. नऊ भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका तर, विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. राज्यात २९५७ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी व्हावे या उद्देशाने मुंबई विभागात २० भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच दोन अतिरिक्त पथके मंडळातर्फे कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. अतिसंवेदनशील विभागांमध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्याचेही खंडागळे यांनी सांगितले. दरम्यान, यंदा अर्ज भरताना लिंग निवडताना ट्रान्सजेंडरचा पर्याय खुला करण्यात आला होता. यात सुमारे ६२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची माहिती खंडागळे यांनी दिली. 

आयपॅडवर परीक्षा 

यंदा विशेष बाब म्हणून मुंबईतील सोफिया कनिष्ठ कॉलेजात निष्का नरेश हसनगडी ही दिव्यांग विद्यार्थिनी आय-पॅडवर परीक्षा देणार आहे. राज्य मंडळातर्फे प्रथमच अशा प्रकारे परीक्षा घेण्यात येणार आहे. निष्का ही बोलू शकत नाही तसेच ती आठ वर्षांची असल्यापासून तिच्या उजव्या हाताच्या हालचालींवरही मर्यादा आल्या आहेत. यामुळे तिला बारावीची परीक्षा आयपॅडवर देण्याची मुभा मिळावी, अशी विनंती मंडळाला केल्याचे तिची आई रश्मी हसनगडी यांनी सांगितले. निष्काने इयत्ता दहावीमध्येही 'एनआओएस'मधून आयपॅडवर परीक्षा दिली होती. त्यानुसार बारावीत तिला मुभा देण्यात आली आहे. आयपॅडवर ती डाव्या हाताच्या एका बोटाने टायपिंग करू शकते ती जे टाइप करेल ते तिला देण्यात आलेला लेखनिक उत्तरपत्रिकेवर लिहून देईल असे तिच्या आईने सांगितले. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी स्पष्ट केले. तिच्या आयपॅडमध्ये कोणताही तपशील नाही, याची खातरजमा करून घेण्याचे आदेश संबंधित केंद्रप्रमुखांना देण्यात आल्याचेही खंडागळे यांनी स्पष्ट केले. 

मुंबई विभागाची आकडेवारी 

जिल्हा विद्यार्थीसंख्या 

शास्त्र कला वाणिज्य एमसीव्हीसी 

ठाणे २७,८७९ १६,८४४ ५०,०६८ ८५६ 

पालघर ११,१७२ १२,३६१ १९,८२५ ५३७ 

रायगड १०,४९२ ८८९४ १२,२९० ७८३ 

मुंबई दक्षिण ११,१४१ ६७२९ २६,३४७ ५५२ 

मुंबई पश्चिम १९,०८९ ५०९७ ५०,२७० ८४८ 

मुंबई उत्तर ११,४०५ ४१३१ २६,९७४ ८४४ 

एकूण ९१,१७८ ५४,०५६ १,८५,७७४ ४४२० 

Stress Free Examination

Board (XII Science) Master Stroke March 2019

प्रा. नीलम कुलकर्णी

M.Sc., B.Ed., DIT, ACIT

 

 भिती जवळ येताच क्षणी तिच्यावर हल्ला करा आणि तिला नष्ट करून टाका असे आर्य चाणक्य सांगतात.

परीक्षा म्हटले की आपोआप ताण (Stress) येतोच ! या ताणाला घाबरून न जाता, विद्यार्थांना धीर देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काही आयत्या वेळेच्या Tips and Tricks निश्चितच उपयोगी पडतात.आणि वर्षभर केलेल्या अभ्यासाची उजळणी (Revision) होते.

English, Physics, Chemistry, Mathematics, Biology, Computer Science, Electronics या विषयांच्या तज्ञांकडून Rapid Revision साठी योग्य असे मार्गदर्शन (Online) Vidyarthimitra.org घेऊन आले आहे खास 12th Science च्या विद्यार्थ्यांसाठी 20 Feb पासुन ही लेख मालिका (Article Series) येत आहे.

          या वर्षीपासून (march 2019) महाराष्ट्र बोर्डाच्या Question Paper चे स्वरुप बदलले आहे. Answer ची Perfect आणि Appropriate मांडणी, Write Up इ.साठी सखोल मार्गदर्शन करणाऱ्या या Article Series चा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जावे.   -  

Stress Free Examination –

Wishing all the students Best of luck

 

Board Exams Time Table 2019

Click to View| Upcoming Entrance Exams

India's Leading Educational Web Portal now available on Google play store                 https://goo.gl/HbsLr2
 

Check FYJC & ALL COURSES UNDER DTE & DMER - Previous & Current Year Cutoff |  http://vidyarthimitra.org/rank_predictor

OR

Download App Now : Cut-offs 2019

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------