Film Courses Admissions

Film Courses Admissions

'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९

PUBLISH DATE 4th January 2019

चित्रपट शिक्षणासाठी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) व कोलकाता येथील सत्यजित रे चित्रपट संस्था येथे प्रवेश घ्यायचा असेल, तर यंदाही सामायिक प्रवेश परीक्षा देता येणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे. सामायिक प्रवेश परीक्षेचा बारगळलेला प्रकल्प गेल्या वर्षीपासून सुरू झाला आहे.

'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' या दोन संस्थांची संयुक्त प्रवेश परीक्षा घेणार येणार आहे. २०१९ या शैक्षणिक वर्षापासूनच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात येईल. 'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' या दोन्ही संस्थांतर्फे संयुक्तपणे प्रवेश परीक्षा घेण्यास मागील वर्षी सुरुवात झाली. या दोन संस्थांपैकी किमान एका तरी संस्थेत प्रवेश मिळवून चित्रपट विषयाशी संबंधित विविध विषयांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना संयुक्त परीक्षा देता येईल. देशातील २६ केंद्रांवर जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (जेईटी २०१९) घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न असे या परीक्षेचे स्वरूप असेल. लेखी परीक्षेतील निकालानुसार पुढील प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.

एफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येतात. दोन संस्थांमधील प्रवेशासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्यायला लागू नये; म्हणून संयुक्त प्रवेश परीक्षेचा प्रस्ताव अनेक वर्षे विचाराधीन होता. तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प बारगळला होता. गेल्या वर्षीपासून ही परीक्षा घेण्यात येत आहे. applyadmission.net/jet2019 या वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांच्या खिशाला झळ

प्रवेश परीक्षेचे शुल्क मागील वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. राखीव गटातील उमेदवारांसाठी एक हजार २५० रुपये, तर खुल्या गटातील उमेदवारांसाठी चार हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी 'एफटीआयआय'च्या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी साडेतीन हजार; तर सत्यजित रे इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेसाठी दोन हजार रुपये शुल्क मोजावे लागत होते; पण दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या सामायिक परीक्षेसाठी प्रत्येकी चार हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकाच अभ्यासक्रमाची परीक्षा दिली होती. यंदा ज्यांना दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करायचा असेल, त्यांना आठ हजार रुपये मोजावे लागतील.

आणखी वाचा | 'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९

JET 2019


राखीव गटासाठी परीक्षा शुल्क१,२५० रुपये

४,००० रुपये

खुल्या गटासाठी परीक्षा शुल्क

८,००० रुपये

दोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या अर्जाचे शुल्क

२६

सामायिक परीक्षेची देशातील केंद्रे

३१ जानेवारी

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

२४ फेब्रुवारी

सामायिक प्रवेश परीक्षेची तारीख

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

CAT https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2018

https://goo.gl/gBdyF8

CTET