DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया आजपासून

PUBLISH DATE 7th June 2018

पुणे -अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सात जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना 19 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून आवश्‍यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह सुुविधा केंद्रावर (फॅसिलिटी सेंटर) जायचे आहे. तेथे कागदपत्रांची पडताळणी होईल, ती अपलोड केली जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा अर्ज निश्‍चित केला जाईल. अर्जनिश्‍चितीनंतर त्याची पोच विद्यार्थ्यांनी न विसरता घ्यायची आहे. 

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक 

तपशील मुदत 
ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, 7 ते 19 जून 
अपलोड करणे, अर्ज निश्‍चिती 

संभाव्य गुणवत्ता यादी प्रसिद्धी 21 जून 

अर्ज भरणे, पडताळणीबाबत हरकती नोंदविणे 22 ते 23 जून 

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी 24 जून 

पहिल्या फेरीसाठी संवर्ग आणि 24 जून 
आरक्षणानुसार उपलब्ध जागांची माहिती 

पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या 25 ते 28 जून 
लॉग इनद्वारे पसंतीक्रम अर्ज सादर 
आणि निश्‍चित करणे 

पहिल्या फेरीतील संभाव्य जागावाटप 29 जून 

पहिल्या फेरीतील जागावाटपानुसार 30 जून ते 4 जुलै 
अर्ज निश्‍चिती केंद्रात (एआरसी) प्रवेश निश्‍चिती 

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 5 जुलै 

दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या 6 जुलै ते 8 जुलै 
लॉग इनद्वारे पसंतीक्रम अर्ज सादर 
आणि निश्‍चित करणे 

दुसऱ्या फेरीतील संभाव्य जागावाटप 9 जुलै 

दुसऱ्या फेरीत प्रथमच जागावाटप झाल्यास 10 ते 12 जुलै 
अर्ज निश्‍चिती केंद्रात जाऊन प्रवेश निश्‍चिती 

तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील 13 जुलै 

तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या 14 जुलै ते 16 जुलै 
लॉग इनद्वारे पसंतीक्रम अर्ज सादर 
आणि निश्‍चित करणे 

तिसऱ्या फेरीतील संभाव्य जागावाटप 17 जुलै 

तिसऱ्या फेरीत प्रथमच जागावाटप झाल्यास 18 ते 20 जुलै 
अर्ज निश्‍चिती केंद्रात जाऊन प्रवेश निश्‍चिती 

 

ऑपशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी मित्र रँक प्रेडीक्टरची मदत घ्या : 

  1. विद्यार्थ्यांना सर्व माहिती विनामूल्य उपलब्ध आहे.

  2. १२ वी नंतर इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेशासाठी सोप्या पद्धतीने कट-ऑफ रँक प्रेडिक्टर बनविले आहे.

  3. रँक प्रेडिक्टर हे हाताळण्यास अत्यंत सोपे युझर फ्रेंडली वेब बेस ऑनलाइन सॉफ्टवेअर आहे.

  4. रँक प्रेडिक्टरमध्ये मागील वर्षाचा कट-ऑफ व त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग, माध्यम, एकूण गुण, शाखा, कोणत्या शहरात प्रवेश हवाय त्या शहराचे नाव, अशा अनेक प्रकारच्या प्रमुख घटकांचा विचार करून संभाव्य महाविद्यालयांची यादी विद्यार्थ्यांना मिळेल.

  5. विद्यार्त्याना रँक प्रेडिक्टरची आऊट-पुट फाईल PDF फॉरमॅट मध्ये मिळेल व त्याची प्रिंट आऊट काढता येईल.