DTE Admissions 2020-21

DTE Admissions 2020-21

इंजिनीरिंग प्रवेश प्रक्रिया : पहिल्या पसंतीक्रमाचा प्रवेश यंदा बंधनकारक

PUBLISH DATE 6th June 2018

पुणे - अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी त्यांचे पसंतीक्रम विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक भरावे लागणार आहेत. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागेल. गेल्यावर्षी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय विद्यार्थ्यांना बदलता येत होते. 

विद्यार्थ्यांना आपल्या गुणांनुसार कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा हे ठरविण्यासाठी प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयांचे पसंतीक्रम ऑनलाइन भरावे लागतात. प्रवेश फेऱ्यांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना महाविद्यालय (ऍलॉट) दिले जाते. पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, तर ते बदलण्याची संधीही दिलेली आहे. त्यासाठी फ्लोटिंग आणि स्लायडिंग असे दोन पर्याय आहेत. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाच असेल, तर फ्रिज हा पर्याय असतो. तो कायम राहणार आहे. 

अडचणी आल्यास हेल्पडेस्क 
प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून सीईटी सेल हेल्पडेस्क सुरू करणार आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन हे केंद्राद्वारे करून घेता येईल. हा हेल्पडेस्क दूरध्वनी, एसएमएस वा ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करेल, असे आनंद रायते यांनी सांगितले. 

आवडीचे महाविद्यालय मिळावे म्हणून विद्यार्थी विचार करून पसंतीक्रम देतात. ते त्यांना मिळाल्यास बेटरमेंट म्हणून दुसरे महाविद्यालय घेण्याचा पर्याय नसतो. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय बदलण्याची मुभा दिल्यास विद्यार्थी ते बदलत राहतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्‍यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी निवडलेले पहिले महाविद्यालय त्यांना मिळाले, तर यंदा तेथे प्रवेश घ्यावाच लागेल. म्हणून पहिला पसंतीक्रम विचार करून भरावा. 
- आनंद रायते, आयुक्त, सामाइक प्रवेश परीक्षा कक्ष 

ऑपशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी मित्र रँक प्रेडीक्टरची मदत घ्या : 

  1. विद्यार्थ्यांना सर्व माहिती विनामूल्य उपलब्ध आहे.

  2. १२ वी नंतर इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेशासाठी सोप्या पद्धतीने कट-ऑफ रँक प्रेडिक्टर बनविले आहे.

  3. रँक प्रेडिक्टर हे हाताळण्यास अत्यंत सोपे युझर फ्रेंडली वेब बेस ऑनलाइन सॉफ्टवेअर आहे.

  4. रँक प्रेडिक्टरमध्ये मागील वर्षाचा कट-ऑफ व त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग, माध्यम, एकूण गुण, शाखा, कोणत्या शहरात प्रवेश हवाय त्या शहराचे नाव, अशा अनेक प्रकारच्या प्रमुख घटकांचा विचार करून संभाव्य महाविद्यालयांची यादी विद्यार्थ्यांना मिळेल.

  5. विद्यार्त्याना रँक प्रेडिक्टरची आऊट-पुट फाईल PDF फॉरमॅट मध्ये मिळेल व त्याची प्रिंट आऊट काढता येईल.

Image result for click here gifhttp://vidyarthimitra.org/rank_predictor

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)