Medical Admissions 2020-21

Medical Admissions 2020-21

‘मेडिकल’ प्रवेशासाठी डो​मिसाइल बंधनकारक

PUBLISH DATE 19th November 2017पुणे : राज्यातील सरकारी, खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये एमडी, एमएस, एमडीएस, पदव्युत्तर पदविका प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे, असा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) घेतला आहे. त्यामुळे राज्याचे अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट-पीजी २०१८’ मार्फत राज्यातील कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.

देशातील मेडिकल कॉलेजांमध्ये एमडी, एमएस, एमडीएस पदव्युत्तर पदविका आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश ‘नीट-पीजी’ व ‘नीट-एमडीएस’ प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार होतात. देशात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या कॉलेजांची संख्या कमी असून, तेथे प्रवेशासाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत राज्यात कॉलेज आणि जागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण दक्षिण आणि उत्तर भारतातील विद्यार्थ्यांचे अधिक आहे. त्यामुळे बाहेरचे विद्यार्थी राज्यातील नामांकित मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवितात. मात्र, त्याचवेळी राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील कॉलेजांमध्ये प्रवेश मिळत नाही. तसेच, परराज्यात कॉलेज आणि जागांची संख्या अत्यल्प असल्याने तेथेही राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्यायच होतो. या विरोधात गेल्यावर्षी ‘डीएमईआर’ प्रशासनाने न्यायालयात याचिका दाखल करून राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्याबाबत विनंती केली होती. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर असे बदल करता येणार नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हे बदल करावेत, अशा सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यानुसार ‘डीएमईआर’ने नुकतीच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयासोबत बैठक घेतली. त्यामध्ये डीएमईआर प्रशासनाला राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट घातली. त्यामु‍ळे अधिवास प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत राज्यातून मेडिकल कॉलेजांमधून एमबीबीएस, बीडीएस आदी अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणाऱ्या मात्र केंद्रीय १५ टक्के कोट्यातून परराज्यात एमबीबीएस, बीडीएस करणारे विद्यार्थी राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये एमडी, एमएस, एमडीएस, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. दरम्यान, ही परीक्षा ७ जानेवारीला होत आहे.

राज्यातील सरकारी, मेडिकल कॉलेजांमध्ये नीट-पीजी, नीट-एमडीएस प्रवेश परीक्षेमार्फत स्टेट मेरिट कोट्यांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील नामांकीत मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश मिळणार आहे. यासोबतच परराज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील कॉलेजांमध्ये प्रवेश घेता येणार नाही. 

- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर

Article Sourse : Maharashtra Times

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------