Higher Education

Higher Education

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय

PUBLISH DATE 29th June 2020

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

भारतामध्ये आजही उच्च शिक्षणापर्यंत पोहोचू शकणाऱ्यांचे प्रमाण तुलनेनं कमी आहे. पहिलीला प्रवेश घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ दहाजणच उच्च शिक्षणाची पायरी गाठू शकतात. नोकरी वा व्यवसायाकडे वळायला लागल्यामुळे अनेकजण पुढे शिकू शकत नाहीत. नोकरी व्यवसायामुळे प्रचलित विद्यापीठांमध्ये जाऊन नियमित शिक्षण घेणं शक्य होत नाही. त्यामुळे काही वर्षांच्या मधल्या गॅपनंतर उच्चशिक्षण घ्यायचं असल्यास कुठे जायचं, असा यक्षप्रश्न काही वर्षांपूर्वी उभा ठाकत असे. पण, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाच्या स्थापनेतून निरंतर शिक्षणाची वाट सुरू झाली. मुक्त विद्यापीठेही केवळ बीए/बीकॉमच्या अभ्यासापुरती मर्यादित नाहीत. लाखो खेड्यापाड्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा या विद्यापीठांच्या माध्यमातून जाऊन पोहोचली आहे. कोणत्याही विद्याशाखेचं शिक्षण आपल्या गावी राहून घेता येईल अशी व्यवस्था या विद्यापाठांनी सुरू केली.

१९८५ साली नवी दिल्ली येथे 'इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा'ची स्थापना झाली. गेल्या काही वर्षांत या विद्यापीठाने आपली व्याप्ती वाढवली. आजमितीला ३३८ उपक्रमांमधल्या तीन हजार ५०० अभ्यासक्रमांमध्ये सुमारे ३० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे अभ्यासक्रम पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि डॉक्टरेट पातळीवरचे आहेत. यांच्या बरोबरीने प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम याद्वारे पूर्ण करता येतात.

पारंपरिक शिक्षणाबरोबरीनेच नव्यानेच उदयास आलेल्या अनेक आंतरशाखीय विषयातील अभ्यासक्रमदेखील 'इग्न'मध्ये उपलब्ध आहेत. उदा. ग्राहक संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, मानवी हक्क, पर्यटन, महिला सक्षमीकरण व बाल विकास, सहभागातून जंगल व्यवस्थापन, सहभागात्मक विकास, अन्न व पोषक आहार, शिक्षण प्रशिक्षण, निरंतर वैद्यकीय शिक्षण असे असंख्य अभ्यासक्रम आज दूरशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खुले झाले आहेत. ज्यामध्ये भौतिक आणि नैसर्गिक विज्ञान, नर्सिग, हेल्थ सायन्स, इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी, संगणक, ग्रंथालय व माहिती विज्ञान, बीएड आदींचा समावेश आहे.

'इग्नू'तर्फे चालवले जाणारे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं बनवताना देशातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली जाते. या विद्यापीठाचं जाळं ४३ प्रादेशिक केंद्रे, सहा सहप्रादेशिक केंद्रे , १४०० अभ्यास केंद्रे याद्वारे देशभर पसरलं आहे. 'इग्नू'ने विविध परदेशी विद्यापीठांसोबत अभ्यासक्रमांची देवाणघेवाण करण्याविषयक अनेक उपक्रमदेखील हाती घेतले आहेत. युनेस्को, कॉमनवेल्थ सेक्रेटरीयट, कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग (कोल), जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्डवाइड फंड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात येत आहे.

'इग्नू'च्या अभ्यासशाखा

० कृषीविषयक अभ्यासक्रम- कृषीक्षेत्रातील नोकरी देणारे अभ्यासक्रम याअंतर्गत उपलब्ध आहेत. यामध्ये प्लँटेशन मॅनेजमेंट, फूड सेफ्टी अँड क्वॉलिटी मॅनेजमेंट, डेअरी टेक्नॉलॉजी, फिश प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी, वॉटरशेड मॅनेजमेंट, मीट (meat) टेक्नॉलॉजी, ऑरगॅनिक फार्मिंग, सेरीकल्चर बी फार्मिंग (मधमाश्या पालन) यावरील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० शिक्षणविषयक उपक्रम- यामध्ये शिक्षक प्रशिक्षण, शिक्षण तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. एमएड, एमए (दूरशिक्षण), एज्युकेशन टेक्नॉलॉजी, स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंट, बीएड, एलिमेंटरी टीचर्स एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन, गायडन्स यांसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल.

० परदेशी भाषा शिक्षण- या अभ्यासशाखेमधून अरेबिक, फ्रेंच, जर्मन, जॅपनीज भाषा प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० भाषाविषयक शिक्षण- यामधून इंग्रजी आणि हिंदी भाषेचं ज्ञान दिलं जातं. भाषासंपादन (Editing) आणि भाषांतर यासाठीदेखील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० कायदेविषयक शिक्षण- या अभ्यासशाखेमध्ये कायद्याच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ, लीगल प्रोसेस आऊटसोर्सिंग, इन्व्हायर्मेटल लॉ, सायबर लॉ, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग लॉ या विषयांचा समावेश आहे.

० विज्ञानशिक्षण- विज्ञान अभ्यासशाखेमध्ये जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आदी विषयांचे बीएससी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या शाखेअंतर्गत अॅदनेलेटिकल केमिस्ट्री, एन्व्हायर्मेंट अँड सस्टेनेबल डेव्हल्पमेंटमधील पदविका घेता येईल.

० टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट- यामध्ये पर्यटनशास्त्रामधील प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटपर्यंतचं शिक्षण उपलब्ध आहे.

० संगणक व माहिती तंत्रज्ञान- यामधून बीसीए, एमसीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो.

० अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान- यामधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि सिव्हिल इंजिनीअरिंगचे डिप्लोमामधून शिक्षण घेता येतं. मॅकॅनिकल इंजिनीअरिंगचे पीएचडीचं शिक्षणदेखील येथे उपलब्ध आहे. तसंच पॉवर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट, क्राफ्ट अँड डिझाइन, लेदर गूड्स मेकिंग यामधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० जेंडर अँड डेव्हल्पमेंट स्टडीज- यामधून विमेन्स स्टडीज व जेंडर अँड डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये डॉक्टरेटचं शिक्षण घेता येईल. एमए इन जेंडर अँड डेव्हलपमेंट स्टडीज हा अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहे.

० इंटर डिसिप्लिनरी अँड ट्रान्स डिसिप्लिनरी स्टडीज- यामधून अरविंदो स्टडीज, इंटिग्रल स्टडीज, संस्कृत भाषा आणि अॅस्ट्रोफिजिक्स यांसारखे आंतरशाखीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसंच लेबर अँड डेव्हल्पमेंट, सोशल अँथ्रॉपोलॉजी, गांधी अँड पीस स्टडीज, फोकलोर (Folklore) अँड कल्चरल स्टडीज आदीमध्ये एमए अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

० स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- यामधून कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधील असंख्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एमबीए, मॅनेजमेंटमधील पीएचडी, इंटरनॅशनल बिझनेस ऑपरेशन, फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मार्केट्स प्रॅक्टीस यामधील पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

० समाजविज्ञान- यामधून इकोनॉमिक्स, हिस्टरी अँड टुरिझम स्टडीज, लायब्ररी अँड इन्फोर्मेशन सायन्स, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि सोशिऑलॉजीमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० ट्रान्सलेशन स्टडीज अँड ट्रेनिंग- यामध्ये ट्रान्सलेशनचं परिपूर्ण शिक्षण दिलं जातं. भाषांतराचा इतिहास, अभ्यास, भाषांतर, समाजशास्त्र व संस्कृती, पाठ्यक्रमाचे व पाठ्यक्रमाव्यतिरिक्त भाषांतर, मीडियातील भाषांतर, मशीन ट्रान्सलेशन आदींचा समावेश होतो. एमए ट्रान्सलेशन स्टडीज या अभ्यासक्रमाबरोबरीनेच मराठी-हिंदी ट्रान्सलेशन, बांगला-हिंदी ट्रान्सलेशन, मल्याळम-हिंदी ट्रान्सलेशन, असमिया-हिंदी ट्रान्सलेशन आदीमधील पदव्युत्तर अॅडव्हान्स डिप्लोमा उपलब्ध आहेत.

० निरंतर शिक्षण- यामध्ये ग्रामविकास, बालविकास, डिसअॅबिलिटी, यूथ अँड डेव्हलपमेंट वर्क, न्यूट्रीशन, फूड सेफ्टी अँड डायेटेटिक्स आदींवर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० विस्तार आणि विकास अभ्यासक्रम- प्रौढ शिक्षण, व्यवसाय शिक्षण, शाळेत येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यायचं याचं प्रशिक्षण, स्वयंपूर्ण बनू शकणारे शिक्षण याचा यामध्ये समावेश होतो. वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं प्रशिक्षण यामधून दिलं जातं.

० आरोग्यविज्ञान- यामध्ये आरोग्य विज्ञानाशी निगडित खालील विषयांतील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, हॉस्पिटल अँड हेल्थ मॅनेजमेंट, गेरीअॅट्रिक मेडिसीन, डिस्ट्रिक्ट हेल्थ मॅनेजमेंट, इन्डोडॉटिक्स, ओरल इम्प्लॉटोलॉजी, नर्सिग, ऑप्टोमेट्री, ऑप्थॅल्मिक टेक्निक या विषयांवर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वैद्यकीय क्षेत्रात विविध विभागांत मदतनीस लागतात. त्याच्यासाठी खालील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. होमबेस केअर प्रोव्हायडर, डायबेटिक केअर फॉर कम्युनिटी वर्कर, हेल्थकेअर वेस्ट मॅनेजमेंट, न्यू बॉर्न अँड इन्फंट केअर, ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ, फीमेल हेल्थ वर्कर, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ केअर.

० पत्रकारिता अभ्यासक्रम- यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमासाठीचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, रेडिओ प्रोग्राम प्रॉडक्शन, ऑडिओ प्रोग्राम प्रॉडक्शन, रेडिओ प्रसारण यामधील पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कम्युनिटी रेडिओ आणि क्रिएटिव्ह मीडिया आर्ट्स-डिजिटल साऊंड यामधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० परफॉर्मिग अँड व्हिज्युएल आर्ट्स- यामध्ये कला, संगीत, नृत्य यांमधील विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिल्पकला, अप्लाइड आर्ट्स, पेंटिंग, थिएटर आर्ट्स, कर्नाटक संगीत, हिंदुस्थानी संगीत, मणिपुरी, कथकली, ओडिसी, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कथ्थक, भरतनाट्यम आदीमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

० समाजसेवा अभ्यासक्रम- सोशल वर्कमधील पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेटपर्यंतचं शिक्षण यामध्ये उपलब्ध आहे.

० व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग- यामध्ये विविध क्षेत्रातील व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. उदा. फार्मास्युटिकल सेल्स मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, सिक्युरिटी मॅनेजमेंट, फायर सेफ्टी, ज्वेलरी डिझायनिंगमधील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

दूरशिक्षण हे आज अधिकाअधिक जवळ यायला लागलं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे घरी बसूनदेखील आपण अभ्यास पूर्ण करू शकता. या ज्ञानमार्गावरून चालताना आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
8th April 2024

CA Exam Postponement 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
5th April 2024

CA Exam Postponement 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
21st March 2024

Learning Courses

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
21st March 2024

CA Exams 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
12th March 2024

TANCET 2024 answer key

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
11th March 2024

Online application process

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
1st March 2024

WB HS Routine 2025

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
29th February 2024

Kerala University Result 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
20th February 2024

AIBE 18 Result 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
5th February 2024

IIRF 2024 Rankings

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
3rd February 2024

France Educational Visa

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
1st February 2024

How to Become Astronaut

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
31st January 2024

NEET MDS 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
30th January 2024

IGNOU 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
20th January 2024

FMGE 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
20th January 2024

UGC NET December 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th January 2024

UGC NET Result December 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th January 2024

SSC JE 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th January 2024

UGC NET Result December 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th January 2024

ICMAI CMA June 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
19th January 2024

Bihar STET 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
18th January 2024

AIBE 18 Exam

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
16th January 2024

AIBE 18 Result 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

उच्च शिक्षणासाठी दूरशिक्षण एक उत्तम पर्याय
13th January 2024

HSSC Group D CET Result