Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी प्रवेशपत्र आणि प्रवेश केंद्रांबाबत गोंधळ (MAHA-TAIT)

PUBLISH DATE 6th December 2017

‘तुम्ही लातूरचे आहात की धुळ्याचे? अच्छा जळगावचे आहात का? पण, काय फरक पडतो? अॅप्टिट्युड परीक्षा द्यायची असेल तर जा भंडाऱ्याला...’ असा अफलातून प्रकार शिक्षण विभागाने केला आहे. शिक्षक भरतीसाठी ज्या अभियोग्यता चाचणीचा मोठा गाजावाजा केला गेला, त्या चाचणीच्या नियोजनाचा खेळखंडोबा झाला आहे. परीक्षाकेंद्रे आणि प्रवेशपत्रे याबाबतच्या असंख्य तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १२ ते २१ डिसेंबरदरम्यान राज्यात या चाचण्या घेण्यात येणार असून शेकडो विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, या प्रवेशपत्रांमध्ये अनेक चुका झाल्या आहेत.

ही प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यासाठी शिक्षण विभागाने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहेत. या संकेतस्थळावरून विद्यार्थी आपली परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे डाउनलोड करीत आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांना चक्क कोरे प्रवेशपत्र आल्याचे प्रकार घडले आहेत. सर्व प्रकारची माहिती अर्जातून पुरवूनही असे प्रकार घडत असल्याबद्दल परीक्षार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या किंवा त‌िसऱ्या पसंतीचे केंद्रवाटप करण्यात आल्याचे मटाने प्रसिद्ध केले होते. मात्र, ज्या केंद्राचा पर्यायच दिला नाही, अशीही केंद्रे वाटप करण्यात आली आहे. जालना, धुळे, जळगाव येथील पर्याय भरल्यानंतर त्यांना भंडारा किंवा विदर्भातील इतर ठिकाणी केंद्रे देऊन ‘महाराष्ट्रदर्शन’ घडविण्याचा प्रकार शिक्षण विभागाने केल्याची तक्रार परीक्षार्थ्यांनी केली आहे.

प्रवेशपत्र आणि प्रवेश केंद्रांबाबतच्या या गोंधळावर शिक्षण क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अभियोग्यता चाचणी याआधीच वादग्रस्त ठरली आहे. या परीक्षेला न्यायालयात आव्हानही देण्यात आले आहे. मात्र, तरीही शासनातील नोकरशहांना देखावा करावयाचा आहे. त्यामुळे, ही चाचणी घेण्याचा घाईघाईने प्रयत्न केला जातो आहे. प्रत्यक्षात शिक्षकांच्या फारशा जागा रिकाम्या नसताना ही चाचणी घेतली जात असल्याची टीका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सहसच‌िव रवींद्र फडणवीस यांनी केली आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------