DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

एमएचटी-सीईटी निकाल, पर्सेंटाइल, अॅडमिशन आणि कन्फ्युजन

PUBLISH DATE 5th June 2019

अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल प्रथमच पर्सेंटाइल पद्धतीने काढण्यात आला आहे. मात्र या पद्धतीबाबत संभ्रम व्यक्त होत आहे. 


पर्सेंटाइलबाबत संभ्रम 
ही परीक्षा यंदा प्रथमच वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आली. यामुळे पर्सेंटाइलचे सूत्र वापरून निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक दिवशीची काठीण्य पातळी पाहून हे पर्सेंटाइल काढण्यात आले आहेत. मात्र बाबत संभ्रम व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या दिवशी हुशार विद्यार्थी परीक्षेस बसले असतील तर चांगले गुण मिळवूनही एखाद्या विद्यार्थ्याला कमी पर्सेटाइल मिळाले असतील, हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे एकाच दिवशी ऑफलाइन परीक्षा घ्यावी, अशी सूचनाही केली जात आहे. मात्र जेईईच्या सूत्रांचा वापर करून हे पर्सेंटाइल तयार करण्यात आल्याचे मत सीईटी सेलचे अध्यक्ष आनंद रायते यांनी स्पष्ट केले. 

MHT-CET Result: How to Calculate Percentile 

अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. सर्वसाधारण गटात 'पीसीबी'मध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) १०० पर्सेंटाइल मिळवत सोलापूरच्या विनायक मुकुंद गोडबोले याने प्रथम क्रमांक मिळवला. तर, मुलींमध्ये नांदेडची रुचा पालक्रितवार ९९.९९ पर्सेंटाइल मिळवत पहिली आली. यंदाच्या निकालात सुमारे २८०० विद्यार्थ्यांनी ९९.५हून अधिक पर्सेंटाइल मिळवल्याने नामांकित कॉलेजांमध्ये कम्प्युटर सायन्स, मॅकेनिकल आणि आयटी या शाखांमध्ये प्रवेशासाठी चुरस असेल. 

यंदा प्रथमच ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली व ती दहा दिवस चालली. राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. ३६ जिल्ह्यांतील १६६ परीक्षा केंद्रांवर १० दिवस १९ सत्रांमध्ये ती चालली. प्रथमच सेंट्रल बेसलाइन टेस्ट झाल्याने या परीक्षेचा निकालही पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक दिवशीचे वेगळे पर्सेंटाइल काढून निकाल जाहीर करण्यात आला. मुंबईतील ज्या कॉलेजांमध्ये विद्यार्थी प्राधान्याने प्रवेश घेतात, त्यामध्ये साधारणत: सर्व शाखा मिळून तीन हजार जागा असतील. मात्र खरी चुरस असणार आहे, ती कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल आणि आयटी शाखांसाठी. 'मुंबईतील कॉलेजांसोबतच बाहेरील शासकीय कॉलेजांमध्येही स्पर्धा असेल', अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश उकरंडे यांनी दिली. तर यातील काही विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स ही परीक्षाही दिली असेल व ते उत्तीर्ण झाल्यास आयआयटीमध्ये जाऊ शकतील, असेही ते म्हणाले. 


जाहीर झालेल्या निकालात राखीव गटामधून नाशिकचा अभिषेक घोलप ९९.९९ पर्सेन्टाइल मिळवत पहिला, तर मुलीमध्ये बीडची गीतांजली वारंगुळे ९९.९९ पर्सेटाइल मिळवून पहिली आली आहे. 'पीसीएम'मध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) धुळ्याचा अमन पाटील ९९.९९ पर्सेन्टाइल मिळवत खुल्या गटात पहिला आला आहे. तर रत्नागिरीची मुग्धा महेश पोखरणकर ९९.९९ पर्सेन्टाइल मिळवत पहिली आली. तर राखीव गटात नांदेडचा आदर्श मुकंदा अभंगे ९९.९९ पर्सेन्टाइल मिळवत पहिला, तर बीडची गीतांजली या गटातही पहिली आली आहे. 

राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी सीईटीच्या निकालानंतर प्रवेश दिले जाणार आहेत. यंदा ही परीक्षा प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली होती. राज्यातील ३६ जिल्हांच्या ठिकाणी १६६ परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पध्दतीने १० दिवस १९ सत्रामध्ये घेण्यात आली. प्रथमच सेंट्रल बेसलाइन टेस्ट झाल्याने या परीक्षेचा निकाल पर्सेन्टाइल पद्धतीने जाहीर केला आहे. परीक्षेसाठी देशभरातून तब्बल चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर त्यापैकी तीन लाख ९२ हजार ३०४ विद्यार्थी बसले होते. पीसीबी गटात खुल्या वर्गातून एक लाख ७१ हजार ९०२ विद्यार्थी, तर राखीव प्रवर्गातून एक लाख ७१ हजार ९०२ विद्यार्थी, असे एकूण दोन लाख ७६ हजार १६६ विद्यार्थी बसले होते. पीसीबी गटात खुल्या वर्गातून ८५ हजार ४६३ विद्यार्थी, तर राखीव गटात एक लाख ९५ हजार ६९१ विद्यार्थी असे दोन लाख ८१हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 

एम.एच. सी.इ. टी. २०१९ च्या निकालाचा संवर्गनिहाय तपशील 

गट खुला राखीव एकूण स्री पुरुष तृतीयपंथी 

पी.सी.एम. १,०४,२६४ १,७१,९०२ २,७६,१६६ ९८,७७४ १,७७,३८४ ८ 

पी.सी.बी. ८५,४६३ १,९५,६९१ २,८१,१५४ १,३४,६६३ १,४६,४८३ ८ 

राज्यात 'सीईटी'च्या निकालात सुमारे २ हजार ८०० विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळाल्याने पुणे आणि मुंबईतील आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या तीन शाखांत प्रवेशासाठी चुरस असेल, तर ९७ पर्सेंटाइलपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय आणि शैक्षणिक दर्जा चांगल्या असणाऱ्या कॉलेजांत प्रवेशासाठी स्पर्धा करावी लागणार आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

'सीईटी सेल'ने इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल यंदा 'जेईई मेन्स'च्या निकालाप्रमाणे पर्सेंटाइल पद्धतीत जाहीर केला आहे. या पर्सेंटाइल पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना ९० पर्सेंटाइल गुण मिळाल्याने प्रत्येकाला आपल्याला चांगले इंजिनीअरिंग कॉलेज मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात चांगल्या कॉलेजांमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या शाखांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांत स्पर्धा राहणार आहे. या परीक्षेत सीईटी परीक्षेत 'पीसीएम' (इंजिनीअरिंग) ग्रुपसाठी दोन लाख ७६ हजार १६६ विद्यार्थी, तर पीसीबी (फार्मसी) ग्रुपसाठी दोन लाख ८१ हजार १५४ विद्यार्थी बसले होते. त्यामुळे पर्सेंटाइल निकालात प्रत्येक ०.१ टक्क्यावर सुमारे २८ विद्यार्थी आहेत. यानुसार ९९ पर्सेंटाइल गुणांच्यावर सुमारे २ हजार ८०० विद्यार्थी राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे शहरातील आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल शाखांत ९९.६५ पर्सेटाइल गुणांपेक्षा अधिक घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी पर्सेंटाइल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाखांमध्ये प्रवेश मिळू शकतो. राज्याचा विचार केल्यास ९७ टक्क्यांपेक्षा अधिक पर्सेंटाइल गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय आणि शैक्षणिक दर्जा चांगल्या असणाऱ्या कॉलेजांत या तीन शाखांमध्ये प्रवेश मिळेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

 

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Call 77200 25900 or 77200 81400

 

MHT-CET Result: How to Calculate Percentile 

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)