Higher Education

Higher Education

बॅचलर ऑफ फाइन आर्टची प्रवेश प्रक्रिया सुरू

PUBLISH DATE 10th July 2019

बॅचलर ऑफ आर्टची प्रवेश प्रक्रिया सुरू

कला संचालनालय मुंबईअंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालायातिल बिएफए (Bachelor of fine Art) या चार वर्षे कालावधीच्या  पदवी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षातर्फे सुरु झालेली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्थळावरून उपलब्ध होणाऱ्या फाईन आर्ट लिंकवरून Admission Portal  वर प्रथम रजिस्ट्रेशन म्हणजेच नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

रजिस्ट्रेशनसाठीची पात्रता:

 कला, वाणिज्य व विज्ञान या कोणत्याही शाखेतून इंग्रजी विषयासह बारावी परीक्षेत खुल्या गटासाठी ४५  टक्के व राखीव गटासाठी ४० टक्के अशी किमान गुणांची अट आहे. प्रवेशासाठी सीईटी  सेल मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या एमएएच-एएसी-सीईटी परीक्षेमध्ये नॉन झीरो स्कोअर प्राप्त करणे आवश्यक आहे.

वेळापत्रक:

 नावनोंदणी व कागदपत्र तपासणी हा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून, रजिस्ट्रेशन, कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ५ ते १० जुलैपर्यंत रात्री ११.५९  वाजेपर्यंत मुदत आहे. योग्य त्या सुविधा केंद्रात कागदपत्रांची तपासणी व अर्ज कन्फर्म करण्यासाठी ११  जुलै रोजी सायंकाळी ५   वाजेपर्यंत कालावधी आहे. राज्यात बीएएफ संस्थांमध्ये फॅसिलेशन सेंटर्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्र अपलोड आर्ट्स अँड क्राफ्ट, कॉमन एंट्रन्स टेस्ट, परीक्षेच्या मेरिटनुसार नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी १२ जुलै रोजी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या पुढील वेळापत्रकासाठी संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे.

उपलब्ध जागा:

 राज्यातील ४ शासकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे ३०० जागा व खासगी ५ महाविद्यालयांमध्ये सुमारे ३०० अशा एकूण ६००जागा  उपलब्ध असून राखीव गटासाठी आरक्षण आहे. प्रवेश राऊंडच्या माध्यमातून मिळाल्यास शैक्षणिक शुल्क सवलती मिळू शकतात. ज्यांन सीईटी परीक्षा दिली अशा, ऑल इंडिया विद्यार्थ्यांसाठी एकूण उपलब्ध जागेच्या ५ टक्के जागा आहेत. ते विद्यार्थीही रजिस्ट्रेशन करू शकतात.

 बीएएफ अभ्यासक्रम:

 या पदवी अभ्यासक्रमात पेटिंग( चित्रकला ),टेक्सटाइल(कापड निर्मिती डिझाइन), इंटेरिअर डेकोरेशन (गृहसजावट) स्क्लप्चर (शिल्पकला) मेटल (धातुकला), अॅप्लाइड आर्टस अशा नावीन्यपूर्ण शाखेत पदवी प्राप्त करता येते

अत्यंत महत्त्वाचे:

 वाढती लोकसंख्या, कमी जागा, फ्लॅट संस्कृती आणि त्यामध्येच उत्कृष्ट सजावट यामुळे या क्षेत्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. देशासह महाराष्ट्रातही अनेक शहरांमध्ये आर्टस गॅलरी उभ्या राहिल्या  असून त्यामध्ये वाढ होत आहे. थोडक्यात, कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना समाजमान्यताही मिळत आहे. म्हणूनच सीईटीमध्ये चांगले गुण असल्यास जरा हटके करिअर करू इच्छिणार्यांना मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश म्हणजे उत्कृष्ट करिअरची संधी होय.

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

https://pune.11thadmission.net

http://www.dydepune.com

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org