Higher Education

Higher Education

बीपीएड प्रवेश प्रक्रिया - २०१८

PUBLISH DATE 3rd July 2018

राज्यातील बीपीएड व एमपीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामयिक परीक्षा घेऊन एक खिडकी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार सीईटी परीक्षा देखील झाली आहे. मात्र, प्रवेशाविषयी कोणतीही माहिती अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आली नसल्याची तक्रार बीपीएड प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी केली आहे. बीपीएड प्रवेशासाठी २ जून रोजी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सीईटी परीक्षेचा निकाल देखील जाहीर झाला. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने प्रवेशाच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात साधारण सहा ते सात हजार जागा या बीपीएड प्रवेशासाठी आहेत. तर, प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी केवळ ३ हजार आहेत. तर, ३ हजार विद्यार्थ्यांमधील १ हजार विद्यार्थी हे अनुदानित कॉलेजला प्रवेश घेतात. उर्वरित २ हजार विद्यार्थी हे विनाअनुदानित कॉलेजला प्रवेश घेतात. मात्र, गेल्या वर्षी अनुदानित कॉलेजात जागा रिक्त असताना देखील विनाअनुदानित कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यामुळे अनुदानित कॉलेजांमधील संपूर्ण जागा भरल्यानंतरच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा आणि प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------