Higher Education

Higher Education

आशियातील सर्वात मोठा कॉलेज फेस्टिव्हल

PUBLISH DATE 20th December 2017

आशियातील सर्वात मोठा कॉलेज फेस्टिव्हल अशी ओळख असलेल्या आयआयटी, मुंबईचा ‘मूड इंडिगो’ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पवई कॅम्पसमध्ये आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सांस्कृतिक सोहळ्याची थीम यंदा ‘कार्निव्हल’ अशी असून शुक्रवार, २२ ते २५ डिसेंबरपर्यंत हा फेस्टिव्हल रंगणार आहे. इंजिनीअर्स घडवणाऱ्या या संस्थेत केवळ पुस्तकी अभ्यासक्रमाला महत्व दिले जात नाही, तर सांस्कृतिक कलागुणांनाही मानाचे स्थान आहे. वैविध्यपूर्ण कलाविष्कार घडवणाऱ्या फेस्टिव्हलचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई हे तंत्रवेड्या विद्यार्थ्यांचे माहेरघर. इंजिनीअरिंगचा अभ्यास करतानाच, या जागतिक फेस्टिव्हलचे आयोजन आयआयटीयन्स गेली ४६ वर्षे यशस्वीरित्या करत आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून आयआयटीयन्स आपला रोजचा अभ्यास सांभाळून ‘मूड इंडिगो’च्या आयोजनात गुंतले होते. अमीया मैत्रेय आणि अनमोल रावत या विद्यार्थी मुख्य समन्वयकांच्या नेतृत्वाखाली विविध विभागाचे बावीस विद्यार्थी व्यवस्थापक ‘मूड आय’च्या आयोजनासाठी काम करत असतात. त्यांना साथ मिळते ती ६००हून अधिक आयआयटीअन्स विद्यार्थ्यांची. हे विद्यार्थी दहा विभागांमध्ये विभागलेले असतात. ही संपूर्ण टीम मतदानाद्वारे नव्हे, तर प्रात्यक्षिक चाचणी आणि मुलाखतीद्वारे नेमली जाते. अशी माहिती मीडिया प्रमुख करण त्रिचल याने ‘मटा’ला दिली.

११६ विविध स्पर्धा

इतर कॉलेज फेस्टिव्हलपेक्षा कित्येक पटीने मोठा असलेल्या ‘मूड आय’मध्ये साहित्यापासून संगीतापर्यंत विविध स्पर्धा, इन्फॉर्मल्स, कॉन्सर्टस, प्रोशोज, कार्यशाळा, सामाजिक उपक्रम आदी इव्हेंट्सचा समावेश असतो. यासर्व इव्हेंट्सच्या आखणीपासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व कामकाज आयआयटीअन्स स्वतः करतात. कोणताही इव्हेंट आऊटसोर्स केला जात नाही, ही कौतुकाची बाब म्हणावी लागेल. विशेष म्हणचे ‘मूड आय’मध्ये तब्बल ११६ विविध स्पर्धा आणि इव्हेंट्सचा समावेश करण्यात आला आहे. फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी www.moodi.org या वेबसाइटवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------