Engineering

Engineering

इंजिनीअरिंगच्या ५६ हजार जागा रिक्त

PUBLISH DATE 4th September 2018

अवघे ७३ हजार ९५० प्रवेश 

विद्यार्थ्यांचा घटता कल 
रिक्त जागाच्या संख्येत वाढ 
चार वर्षापासून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांकडे घटता कल दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही हजारोंच्या संख्येने जागा रिक्‍त राहिल्या आहेत. इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांतील तब्बल ५६ हजार ४०६ जागा शिल्‍लक आहेत. यंदा काही इंजिनीअरिंग कॉलेजांच्या मान्यता काढल्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे आठ हजार जागा कमी झाल्या होत्या. यामुळे शिल्लक जागांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. या वर्षी अवघ्या ७३ हजार ९५० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. ही आकडेवारी गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी असल्याचे समोर आले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून इंजिनीअरिंग आणि व्यवस्थापन अenभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मागणी नसल्याचे समोर येत आहे. यामुळे या कॉलेजांमधील रिक्त जागांचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. तरीही या अभ्यासक्रमांना दरवर्षी मान्यता मिळत असल्याने यंदाही या अभ्यासक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्यावर्षी तब्बल १ लाख ३८ हजार २२६ जागा इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या होत्या त्यापैकी ५६ हजार ४९० जागा रिकाम्या राहिल्या यावर्षी राज्यातील ३४७ इंजिनीअरिंगच्या १ लाख ३० हजार ३५६ जागा होत्या त्यापैकी तब्बल ५६ हजार ४०६ जागा रिकाम्या राहिल्या आहेत.

एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमांच्याही तब्बल ५ हजार २७७ जागा रिकाम्या राहिल्या. 

औषधनिर्माणशास्त्राला सर्वाधिक पसंती 

राज्यातील विद्यार्थ्यांनी औषधनिर्माणशास्त्र या विषयाला यंदा सर्वाधिक पसंती दिली असल्याचेही समोर आले आहे. औषधनिर्माणशास्त्रच्या २३७ महाविद्यालयात असलेल्या १७ हजार १८८ जागांपैकी १६ हजार ८७३ जागांवर प्रवेश झाले असून केवळ ३१५ जागा म्हणजेच १.८३ टक्के जागा रिकाम्या राहिल्या आहेत. 

यावर्षी रिक्‍त असलेल्या अभ्यासक्रमनिहाय जागा. 

शाखा क्षमता प्रवेश रिक्त जागा 

इंजिनीअरिंग १,३०,३५६ ७३,९५० ५६,४०६ 

एमबीए/एमएमएस ३४४०७ २९४०४ ५००३ 

फार्मसी १७,१८८ १६,७८३ २१७ 

आर्किटेक्चर ५२७७ ४८०० ४७७ 

एमसीए ८२३० ४१९२ ४०३८ 

 

upsc.gov.in

Read More | MICAT 2018

 

 

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org. Now send WHATSAPP message.