Engineering

Engineering

इंजिनीअरींगच्या ४० टक्के जागा रिक्त

PUBLISH DATE 13th September 2017

इंजिनीअरींगच्या ४० टक्के जागा रिक्त

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचे चित्र असून व्यवस्थापन अभ्यासक्रमांना त्या तुलनेत अधिक प्राधान्य दिले जात आहे, तर फार्मसी अभ्यासक्रमाला सर्वाधिक मागणी आहे. पुणे विभागातील इंजिनीअरिंग वगळता अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश जवळपास पूर्ण होत आले आहेत. फार्मसी व एमबीएचे अनुक्रमे ९७ व ८४ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत; तर इंजिनीअरिंगचे फक्त ६० टक्के प्रवेशच पूर्ण झाले आहेत. डिप्लोमा इंजिनीअरिंगचे निम्मे प्रवेशही पूर्ण झालेले नाहीत.

यंदा पुणे विभागात दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमाच्या ४४ हजार जागांपैकी ४३ टक्के जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर इंजिनीअरिंगसाठी असलेल्या ५५ हजार ४५९ जागांपैकी ३३ हजार ४०८ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परिणामी ४० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. एमसीए अभ्यासक्रमालाही तुलनेने कमी प्रतिसाद मिळालेला दिसतो. या अभ्यासक्रमाच्या ३३ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. फार्मसीसाठीच्या एकूण ४ हजार २५५ जागांपैकी केवळ ८८ जागा रिक्त आहेत; तर एमबीएच्या रिक्त जागांचा आकडा २ हजार ३९५ एवढा आहे.

इंजिनीअरिंगसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. मात्र, त्या तुलनेत विद्यार्थ्यांचा ओढा अन्य अभ्यासक्रमांकडे असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमांना असलेली मागणी टिकून राहिली आहे. फार्मसी अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे.

 

विद्यार्थी मित्र जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा  https://goo.gl/YPjt94