Engineering

Engineering

‘अभियांत्रिकीचे वीस टक्के विद्य़ार्थीच नोकरीला लायक’

PUBLISH DATE 4th September 2017

यापुढे इंटर्नशिप केल्याखेरीज मिळणार नाही पदवी

नवी दिल्ली: भारतात दरवर्षी पंधरा लाख विद्य़ार्थी अभियंता (इंजिनिअर) होऊन बाहेर पडतात. पण यातील वीस टक्के विद्यार्थी नोकरीच्या लायक असतात, असा अहवाल मॅकेंझीने दिला आहे.

या अहवालानुसार तज्ज्ञांच्या मतांनुसार अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारे ८० टक्के इंजिनिअर हे नोकरीसाठी योग्य नसतात. यामुळे देशातील विविध संस्था आणि महाविद्यालयांना मान्यता देणाऱ्या अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (एआयसीटीई)ने अशा परिस्थितीत काही बदल करण्यासाठी पाऊल उचलेले आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना रिजगाराभिमुख करण्यासाठी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकानुसार चार ते आठ आठवड्यांच्या तीन इंटर्नशीप करणे सक्तीचे केले आहे. एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की; आतापर्यत विद्यार्थांना इंटर्नशीप करणे सक्तीचे नव्हते. पण आता हा पाठ्यक्रमाचा भाग असेल. पाठ्यक्रम सुरू असताना तीन इंटर्नशीप न करणाऱ्या विद्यार्थांना पदवी दिली जाणार नसल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी ही इंटर्नशीप करावी लागणार आहे. पहिले वर्ष सोडून दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी ही इंटर्नशीप करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या वर्षीही इंटर्नशीप करण्यासाठी सांगितले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाबाबतच ज्ञान अवगत होऊ शकेल.

Find Your Dream Job: https://goo.gl/YPjt94