11th Admissions 2020-21

11th Admissions 2020-21

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया: भाग २ भरा आजपासून

PUBLISH DATE 19th June 2019

अकरावी प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच कॉलेजांचे पर्याय वेबसाइटवरून भरण्यास आज, बुधवारपासून (१९ जून) सुरुवात होणार आहे. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना ८ ते १० जुलै दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी मंगळवारी दिली. पहिल्या पर्यायाचे कॉलेज अॅलोट झाल्यावर प्रवेश घेणे अनिवार्य राहणार असून, अर्ज 'व्हेरिफाइड' केल्याशिवाय 'भाग २' भरता येणार नाही.

ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावीत विज्ञान, वाणिज्य व कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी समितीमार्फत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्जातील 'भाग १' भरण्याची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यानुसार ७३ हजार ८८३ हजार विद्यार्थ्यांनी 'भाग १' भरला आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग २ भरण्यास सुरुवात होईल, अशी आशा होती. मात्र, सुरुवात झाली नाही. त्यामुळे अर्जातील भाग २ भरण्यासाठी विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. त्यानुसार आज बुधवारपासून विद्यार्थ्यांना भाग २ भरता येणार आहे. हा भाग भरण्याची अंतिम मुदत २९ जूनपर्यंत राहणार आहे.

१९ ते २४ जून या कालावधीतील शून्य फेरीत सामान्य शाखेच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसोबतच द्विलक्षी विषय व एचएसव्हीसी शाखेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासह कोटा प्रवेश प्रक्रिया (व्यवस्थापन, इन-हाउस, अल्पसंख्याक) १९ ते २९ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. द्विलक्षी विषयाची गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार २७ व २८ जून रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचे आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

इ. ११वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कांवरून कोणत्या विद्याशाखेत व कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल (Arts, Science, Commerce, MCVC, Polytechnic), यासंदर्भातील अचूक व अद्यावत कट ऑफची माहिती (https://goo.gl/rT2vXd)  विद्यार्थी मित्र अॅप व पोर्टलवर उपलब्ध आहे.

 

शून्य फेरी

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी, द्विलक्षी विषय, एचएसव्हीसी शाखेसाठी अर्ज भरणे (भाग १ व २) - १९ ते २४ जून

कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी अर्ज भरणे (भाग १ व २) - १९ ते २९ जून

कोटा प्रवेश प्रक्रिया (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक) - १९ ते २९ जून

द्विलक्षी विषयाची गुणवत्ता यादी जाहीर - २६ जून

द्विलक्षी विषयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिच करणे - २७ व २८ जून

सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर - १ जुलै

सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयात आक्षेप नोंदवणे - २ व ३ जुलै

पहिली फेरी

पहिली गुणवत्ता यादी जाहीर - ६ जुलै

पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित करणे - ८ ते १० जुलै

पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ व दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा - १० जुलै

प्रवेशाचा भाग १ व २ भरणे, आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे - ११ व १२ जुलै

दुसरी फेरी

दुसरी गुणवत्ता यादी जाहीर - १५ जुलै

दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित करणे - १६ ते १८ जुलै

दुसऱ्या गुणवत्ता यादीचा कटऑफ व तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा - १८ जुलै

प्रवेशाचा भाग १ व २ भरणे, आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे - १९ व २० जुलै

तिसरी फेरी

तिसरी गुणवत्ता यादी जाहीर - २३ जुलै

तिसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित करणे - २४ ते २६ जुलै

तिसऱ्या गुणवत्ता यादीचा कटऑफ व तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा - २६ जुलै

प्रवेशाचा भाग १ व २ भरणे, आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे - २७ व २८ जुलै

विशेष गुणवत्ता फेरी

विशेष गुणवत्ता यादी जाहीर - ३१ जुलै

विशेष गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित करणे - १ व २ ऑगस्ट

रिक्त जागा जाहीर - ३ ऑगस्ट

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018-19 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org पोर्टलवर तसेच https://goo.gl/rT2vXd या मोबाईल अॅॅप वर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1, 2, 3 & 4  http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

https://pune.11thadmission.net

http://www.dydepune.com

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

India's Leading Educational Web Portal now available on Google play store                 https://goo.gl/HbsLr2
Check FYJC & ALL COURSES UNDER DTE & DMER - Previous & Current Year Cutoff |  http://vidyarthimitra.org/rank_predictor

OR

Download App Now : Cut-offs 2019