11th Admissions 2019-20

11th Admissions 2019-20

अकरावीच्या प्रवेश क्षमतेत पाच टक्‍क्‍यांनी वाढ

PUBLISH DATE 15th June 2018

पुणे - अकरावीच्या प्रवेश क्षमतेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण 285 महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एच.एस.व्ही.सी. या शाखांमधील सुमारे 96 हजार 320 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे.

अकरावीच्या प्रवेश क्षमतेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण 285 महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एच.एस.व्ही.सी. या शाखांमधील सुमारे 96 हजार 320 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे.

गेल्या वर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी 91 हजार 670 जागा होत्या. शैक्षणिक वर्ष 2017-18 च्या तुलनेत यंदा कला शाखेत एक हजार 30, वाणिज्य शाखेत एक हजार 905, विज्ञान शाखेत एक हजार 810 जागांनी वाढ झाली आहे. तर एच.एस.व्ही.सी.च्या जागा गेल्या वर्षीच्या तुलनेत 95ने कमी झाल्या आहेत. यंदा प्रवेशासाठी सुमारे चार हजार 650 जागांची वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशाच्या जागांमध्ये 5.7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली.

यंदा विज्ञान शाखेत सर्वाधिक अशा 39 हजार 90 जागा असून त्याखालोखाल वाणिज्य शाखेत 38 हजार 660 जागा उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्जातील भाग एक आणि भाग दोन भरता येत आहेत. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 77 हजार 822 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

त्यातील 39 हजार 828 विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे; तर 23 हजार 582 विद्यार्थ्यांनी भाग दोन म्हणजे गुण आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरेल आहेत. द्विलक्ष्यी (बायोफोकल) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी एक हजार 406 विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले आहेत.

एम.सी.व्ही.सी. प्रवेशासाठी एकूण चार हजार 570 जागा उपलब्ध असून त्यामध्ये मराठी माध्यमासाठी तीन हजार 40, तर इंग्रजी माध्यमासाठी एक हजार 530 जागा आहेत. अकरावी प्रवेशाला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांची आणि जागांची माहिती घेऊन अर्ज भरावेत. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती www.dydepune.com आणि http://pune.11thadmission.net या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.

अकरावी प्रवेश क्षमता -
शाखा : शैक्षणिक वर्ष 2018-19 : शैक्षणिक वर्ष 2017-18
कला शाखा : 14,000 : 12,970
वाणिज्य शाखा : 38,660 : 36,755
विज्ञान शाखा : 39,090 : 37,280
एच.एस.व्ही.सी : 4,570 : 4,665
एकूण : 96,320 : 91,670

 

इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |