11th Admissions 2019-20

11th Admissions 2019-20

इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया बायफोकल विषयांच्या राज्यातील ५५ % जागा रिक्त

PUBLISH DATE 5th July 2018

दोन कारणांमुळे प्रवेशात गोंधळ 

दरवर्षी राज्यभरातील विद्यार्थ्यांचा ओढा असणाऱ्या बायफोकल विषयांच्या राज्यातील सुमारे ५५ टक्के जागा रिक्तच आहेत. बायफोकल विषयांच्या प्रवेशासाठी दोन स्वतंत्र फेऱ्या होऊनही ही स्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचा प्रवेशाकडे कल असूनही दोन महत्त्वाच्या बाबींमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे हे विशेष. यंदा बायफोकल विषयांसाठी स्वतंत्र प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या खऱ्या, परंतु त्या अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यानच झाल्यामुळे विद्यार्थी, पालकांचा गोंधळ उडाला. तसेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत फॉर्मचा भाग एक आणि दोन भरताना विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय न निवडल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. बायफोकलची पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज जाहीर होणार असून सध्या निर्माण झालेल्या स्थितीमुळे बहुतांश जागा महाविद्यालयस्तरावरच भरल्या जाण्याची शक्यता आहे. 

बायफोकल अभ्यासक्रम कॉलेजबरोबरच करता येतात. बारावीच्या निकालाबरोबर बायफोकल कोर्सचे सटिर्फिकेटही विद्यार्थ्यांच्या हातात येते. पुढील अभ्यासक्रमांसाठी बायफोकल अभ्यासक्रम उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बायफोकलकडे ओढा असतो. परंतु, यंदा झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसह पालक त्रासले आहेत. मागील वर्षीपासून पुणे-मुंबईच्या धर्तीवर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. मागील वर्षी ऑनलाइन प्रवेशाचे पहिलेच वर्ष असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत, यासाठी शिक्षण विभागाने मे महिन्याअखेर अर्ज नोंदणी प्रक्रियेस सुरुवात केली होती. तसेच बायफोकलसाठी स्वतंत्र प्रवेश फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बायफोकल अभ्यासक्रमाच्या दोन्ही प्रवेश फेऱ्याही नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. मात्र, या फेऱ्यांनंतरही ५५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे आता या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे काय? असा प्रश्न कॉलेजांना सतावतो आहे. तर आम्ही ऑप्शन देऊनही यादीत नाव का नाही?, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. या विषयी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता, रिक्त जागा सर्व साधारण गुणवत्ता यादीत समाविष्ट करण्यात येणार असून, त्याअंतर्गतच प्रवेश केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. 

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.


आज जाहीर होणार पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी 
अकरावी प्रवेशाच्या वेळीच स्वतंत्र प्रवेश फेरी राबवण्याच्या निर्णयामुळे धावाधाव; अर्ज भरताना योग्य पर्याय न निवडणेही जागा रिक्त राहण्यासाठी ठरले कारणीभूत 

अर्ज भरताना झाल्या चुका 
भाग एक आणि भाग दोन असे दोन्ही अर्ज भरताना बायफोकल विषय घ्यायचा असेल तर दोन्ही ठिकाणी एस हा पर्याय निवडणे आवश्यक होते. काही विद्यार्थ्यांनी भाग एकमध्ये हे ऑप्शन निवडल्यानंतर भाग दोनच्या अर्जात त्याची नांेदच केली नाही. परिणामी आज अर्ध्याहून अधिक जागा रिक्त आहेत, अशी माहिती देवगिरी कॉलेजचे प्राचार्य आर. बी. गरुड यांनी दिली. 

आज लागणार गुणवत्ता यादी; ६ ते ९ जुलैदरम्यान प्रवेश 
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ११ मेपासून सुरू करण्यात आली. यंदा ११२ कनिष्ठ महाविद्यालये या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाली असून त्यांची प्रवेश क्षमता २८ हजार ७३५ एवढी आहे. १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरला आहे. गुरुवारी (५ जुलै) सकाळी ११ वाजता केंद्रीय प्रवेशाची पहिली सर्व साधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीसाठी अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते ९ जुलैदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. 


...तर कॉलेजस्तरावर प्रवेश 
बायफोकलच्या एकूण ५५ टक्के जागा रिक्त आहेत. दोन फेऱ्या स्वतंत्ररीत्या घेतल्यानंतरही अशी परिस्थिती असल्याने ऑगस्टमध्ये सध्याच्या पद्धतीने अथवा कॉलेजस्तरावरच या जागा भरल्या जाऊ शकतात. त्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु अशी प्रक्रिया विचाराधीन असल्याचे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अधिकारी ओविस शेख यांनी दिली. 


जिल्ह्यात बायफोकलच्या एकूण ४६४३ जागा 
बायफोकल हा विषयांचा वेगळा ग्रुप असून बायोलॉजी आणि द्वितीय भाषा विषय नको आहे, इंजिनिअरिंग करायचे आहे. असे विद्यार्थी बायफोकल हा अभ्यासक्रम निवडतात. या ग्रुपमध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचा समावेश होतो. या अभ्यासक्रमात शंभर गुणांची थेअरी आणि शंभर गुणांचे प्रात्यक्षिक आहे. असा एकूण २०० गुणांचा हा पेपर असतो. ज्यांना मॅथ्स आणि द्वितीय भाषा विषय नको आहे असे विद्यार्थी क्रॉप सायन्स, फिशरी, स्कूटर मोटार मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल हे विषय निवडतात. 

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------