11th Admissions 2019-20

11th Admissions 2019-20

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याची दुसरी फेरी

PUBLISH DATE 4th September 2018

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याची दुसरी फेरी आजपासून (मंगळवार) सुरू होणार आहे.

या फेरीत दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले किंवा एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच आतापर्यंत कोठेही प्रवेश न घेतलेले, प्रवेश न मिळालेले, प्रवेश रद्द केलेले किंवा नव्याने अर्ज करणारे विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतील.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने प्रवेश घेण्याकरता निश्चित कार्यपद्धतीनुसार हे प्रवेश होणार आहेत. त्यामुळे रिक्त जागेवर प्रथम ऑनलाइन क्लिक करणाऱ्या विद्यार्थ्यासच प्रवेश मिळेल. ही फेरी तीन गटांमध्ये होणार आहे. ६० ते १०० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा पहिला, ३५ ते १०० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा दुसरा व मार्च १८ व जुलै १८च्या दहावीच्या परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा तिसरा गट अशा तीन गटांत ही प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती प्रवेश प्रक्रियेच्या प्रमुख मीनाक्षी राऊत यांनी दिली. या फेरीचे सविस्तर वेळापत्रक अकरावी प्रवेशाच्या https://pune.11thadmission.net.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या गटानुसार दिलेल्या दिवशी व वेळेत अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या वेबसाइटवर जाऊन आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-इन करायचे आहे. त्यानंतर योग्य ती शाखा व माध्यम निवडून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर कॉलेज कोड समोर रिक्त जागांचा तपशील दिसेल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्याला हवे ते महाविद्यालय निवडायचे आहे. तिथे रिक्त जागा असल्यास ती जागा या विद्यार्थ्याला मिळेल व त्याची स्लिप तयार होईल. त्याची प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

पाच सप्टेंबरला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पहिल्या फेरीच्या पहिल्या गटासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाईल. सहा सप्टेंबरला विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करायचा आहे व त्याच दिवशी जाऊन मूळ कागदपत्रे सादर करून प्रवेश अंतिम करता येईल. सात सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता दुसऱ्या गटासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. आठ तारखेला सकाळी दहा ते पाच दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने आपला प्रवेश निश्चित करता येईल. स्लिपची प्रिंट घेऊन त्याच दिवशी महाविद्यालयात जाऊन प्रवेश अंतिम करावा लागेल. १० तारखेला तिसऱ्या गटासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. ११ तारखेला सकाळी दहा ते पाच या वेळेत तिसऱ्या गटामधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने आपला प्रवेश निश्चित करता येईल. ११ व १२ तारखेला त्यांना महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करता येईल.

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असल्याने या क्षणी रक्त दिसणारी जागा पुढच्या क्षणी भरली जाऊ शकते एकाच वेळी इतर कोणताही विद्यार्थी त्याच जागेवर प्रवेश घेऊ शकतो. त्यामुळे प्रवेश रद्द केल्यास व त्यानंतर महाविद्यालयाची निवड करण्याची जवाबदारी विद्यार्थी व पालकांची असेल,' असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश रद्द करण्यासाठी

यापूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करण्यासाठी चार व पाच सप्टेंबर दरम्यान सकाळी ११ ते ५ या वेळेत ऑनलाइन लिंक सुरू राहणार आहे. या वेळेतच विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश ऑनलाइन पद्धतीने रद्द करू शकतील. याच वेळेत आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना नवीन अर्ज करता येतील किंवा विद्यार्थ्यांचे अपूर्ण अर्ज पूर्ण करता येतील. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केला नाही, असे विद्यार्थी व दहावी उत्तीर्ण किंवा एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना नवीन माहिती पुस्तिका घेऊन अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना पूर्वीचा प्रवेश रद्द करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना या फेरीतील रिक्त जागांवरच प्रवेश मिळणार आहे.

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1, 2, 3 & 4  http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

https://pune.11thadmission.net.in/

READ | These tips will help NEET repeaters to secure a seat next year

READ | Tips to crack JEE

Also Read : List Of Foreign Medical Institutions/Universities For MBBS

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------