11th Admissions 2019-20

11th Admissions 2019-20

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीत फायदा एकूण ९९ हजार ७३५ जागा उपलब्ध

PUBLISH DATE 28th July 2018

- अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीत फायदा

- पसंतीक्रम भरण्याचा आज शेवटचा दिवस

- एकूण ९९ हजार ७३५ जागा उपलब्ध

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर अल्पसंख्याक कॉलेजांतील सहा हजार ८०२ जागा केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे तिसऱ्या फेरीसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ९९ हजार ७३५ जागा उपलब्ध असणार आहेत. या जागांचा पसंतीक्रम भरण्यासाठी आज, शनिवारचा शेवटचा दिवस आहे.

कोट्यातील जागांच्या गोंधळामुळे गुरुवारी जाहीर होणारी अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी आता मंगळवारी जाहीर होणार आहे. या यादीसाठी असलेल्या रिक्‍त जागांची आकडेवारी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाने जाहीर केली आहे. मंगळवारी जाहीर होणाऱ्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी एकूण ९९ हजार ७३५ जागा उपलब्ध आहेत. ही आकडेवारी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर यादी पुढे ढकलण्यात आल्याने अल्पसंख्याक कॉलेजातील इनहाऊस कोट्यातून सहा हजार ८०२ जागा केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. या जागांचा फायदा तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

दरम्यान, केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेत सहभागी केलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा पुन्हा कॉलेजांना जमा केल्यामुळे आता अल्पसंख्याक कोट्यात एकूण ५८ हजार २८३ जागा रिक्त आहेत, तर व्यवस्थापन कोट्यातील ११ हजार ८१२ आणि इन हाऊसमधील १२ हजार ९११ जागा रिक्त आहेत.

'केंद्रीभूत'मध्ये शाखानिहाय रिक्त जागा

कला १२,३५६

वाणिज्य ५३,२१९

विज्ञान ३१,५९४

एमसीव्हसी २,५५७

एकूण ९९,७३५

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1 & 2 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1 & 2 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

जास्तीत विद्यार्थांना व पालकांना हि अमूल्य माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना कॅप राउंड ३ चा फॉर्म भरायला मदत होईल

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------