Schools

Schools

११वी आण‌ि १२वीसाठी अभ्यासाचे नियोजन

PUBLISH DATE 6th November 2017

११वी आण‌ि १२वीच्या वर्षांमध्ये विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेबरोबरीनेच विविध प्रवेश परीक्षांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन नेमके कसे करावे, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. याबाबतच थोडा विचार करूया.

महाराष्ट्र बोर्डाने ११ वी आण‌ि १२वी विज्ञानशाखेच्या अभ्यासक्रमाची रचना सीबीएसई प्रमाणेच केली आहे. १२ वीची बोर्डाची परीक्षा वर्णनात्मक (सब्जेक्टिव्ह) आहे. तेथे दीर्घोत्तरी प्रश्न, गणिते, संकल्पना स्पष्ट करा, यासारखे प्रश्न विचारले जातात. तर अखिल भारतीय पातळीवरील प्रवेश परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरुपाचे (योग्य पर्याय निवडा) प्रश्न विचारले जातात. या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. चुकीचे उत्तर लिहिल्यास गुण वजा केले जातात. बोर्डाच्या परीक्षेत उत्तरे पाठ करून विद्यार्थी थोडेफार गुण मिळवू शकतात, पण प्रवेश परीक्षेत पाठांतर करून गुण मिळवणे शक्यच नसते. एकाच संकल्पनेवर आधारीत असंख्य प्रश्न काढता येतात. त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या तयारीमध्ये संकल्पना समजावून घेण्याच्या बरोबरीनेच त्याचे उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) करणे हे महत्त्वाचे आहे. प्रवेश परीक्षेमध्ये वेळही मर्यादित असतो त्यामुळे एकाच प्रश्नावर फारवेळ थांबून चालत नाही. दहावीच्या परीक्षेतील ‘लक्षात ठेवा/पाठ करा व ते परीक्षेत उतरवून काढा’, हे तंत्र १२वीला फारसे उपयोगी पडत नाही. १२ वीला आधी संकल्पना समजून घेणे, लक्षात ठेवणे व परीक्षेत त्याचे कमीत कमीवेळात अ‍ॅप्लिकेशन करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांनी हे का? (WHY) व कसे (HOW) हे प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे. रोजचा अभ्यास रोज करणे महत्त्वाचे आहे. स्वत:च्या अभ्यासासाठी वेळ काढणेही महत्त्वाचे आहे. विविध संकल्पना समजून घ्या.

वेळोवेळी अधिक महिती साठी विद्यार्थी मित्र वेब पोर्टल ला भेट देत रह.


विविध प्रवेश परीक्षांच्या आदल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास संकल्पनावर आधारित प्रश्नांची संख्या अधिक दिसते. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या पुस्तकांबरोबरीनेच सीबीएसईची ८वी ते १२वीपर्यंतची पुस्तके अभ्यासणे उपयुक्त ठरेल. सीबीएसईची पुस्तके एनसीईआरटीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येतील. प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम, ११वी आण‌ि १२वी महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ ठेवला पाहिजे.

Read More: 

Joint Entrance Examination (JEE)

National Eligibility and Entrance Test (NEET)

Maharashtra Health and Technical Common Entrance Test (MHT CET).

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------